shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तिखी येथे कृषीकन्यांकडून 'कृषी मार्केटिंग ॲप 'चे शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक घेण्यात आले.

तिखी येथे कृषीकन्यांकडून 'कृषी मार्केटिंग ॲप 'चे शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक  घेण्यात आले.

इंदापूर प्रतिनिधी:मौजे तिखी  येथे  डॉ. शरद चंद्र पवार
 कृषी महाविद्यालय बारामती येथील कृषी कन्यांकडून कृषी मार्केटिंग ॲप चे शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक करण्यात 
    कृषी कन्यांनी सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य अशी बाजारपेठ आणि पिकांना योग्य  बाजार भाव मिळावा यासाठी विविध 'कृषी मार्केटिंग ॲप 'चे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये अॅप डाऊनलोड करण्यापासून त्याचा वापर आणि फायदे यासंबंधीत माहिती देण्यात आली .शेतकऱ्यांनी स्वतः ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करण्याची प्रक्रिया समजून घेतली. यादरम्यान शेतकऱ्यांना आलेल्या शंकांचे कृषीकन्यांकडून निरसन करण्यात आले. या प्रात्यक्षिकाद्वारे 'कृषी मार्केटिंग ॲप 'हे उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील दुवा ठरून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य असा भाव मिळू शकतो, हे कृषिकन्या कु. अपेक्षा हरगुडे, आरती जाधव, तेजस्विनी मारकड ,वर्षा पांढरे, शिवांजली रणवरे ,मंगल दिवटे, वैष्णवी गायकवाड यांनी पटवून दिले. या प्रात्यक्षिकांच्या नियोजनासाठी कृषीकन्यांना प्राध्यापक ए.डी .भोईटे यांनी मार्गदर्शन केले.
close