श्री छत्रपती महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन
इंदापूर (प्रतिनिधी):
श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे, श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर येथे महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या कला शाखाप्रमुख प्रा. शिवाली माने देशमुख उपस्थित होत्या. त्या मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी जीवनात यश प्राप्त करायचे असेल तर, प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना प्रामाणिकपणाला अतिशय महत्त्व द्यावे. असे आवाहन विध्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आयुष्यात पुढे जाऊन उज्वल भविष्याला गवसणी घालायची असेल तर डोळसपणे स्वप्न बघा. त्या दिशेने वाटचाल करा. कर्तृत्व अन् कर्तबगारीची रेषा स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण करा. दुसऱ्याची रेषा पुसून स्वतःची कर्तृत्वाची रेषा कधीच निर्माण करता येत नाही. असे मत त्यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या समन्वयक व वाणिज्य शाखा प्रमुख.प्रा. योगिता तरंगे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सर्व उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
कु. प्रगती वाघमारे व कु.कोमल कापरे ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर करीना घोळवे हिने कार्यक्रमाचे आभार मानले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

