shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचंड आक्रोश मोर्चा

इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचंड आक्रोश मोर्चा 

अतुल खुपसेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तर राष्ट्रवादीचा झेंडा आणि दांडा मोर्चाची सर्वत्र चर्चा 

इंदापूर : इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी तसेच उजनी जलाशलायातील इंदापूर तालुक्याचा हक्काच्या पाच टीएमसी पाण्याला तीव्र विरोध करून, तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शेतीचे नुकसान करू पाहणाऱ्या, जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे  व  महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर येथे प्रचंड मोठा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. 
इंदापूर शहरातील तहसिलकार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी, सोमवार ( दि. १८ सप्टेंबर ) रोजी सकाळी हा मोर्चा राष्ट्रवादी संपर्क कार्यालय ते तहसिल कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी अतुल खुपसे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करून, त्यांच्या प्रतिमेला महिलांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला. या मोर्चात पदाधिकारी, कार्यकर्ते व महिलांचा मोठा सहभाग पाहण्यास मिळाला. यावेळी तहसिलदार श्रीकांत पाटील व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले. 
 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, अमोल भिसे, जेष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, बाळासाहेब करगळ, तालुका उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे, अण्णासाहेब धोत्रे भटक्या विमुक्त जाती जमाती सेल पुणे जिल्हा अध्यक्ष.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, अतुल झगडे, सचिन खामगळ, शुभम निंबाळकर, संजय चव्हाण,प्रकाश अण्णा शिंदे, उद्योजक अनिकेत भरणे, स्वप्नील धुमाळ, रमेश आबा शिंदे, हामा पाटील, इम्रान शेख, राहुल गुंडेकर, वसीम बागवान, स्वप्नील राऊत, अनिकेत वाघ, अमर गाडे  राष्ट्रवादी व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलताना हनुमंत कोकाटे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चुली विझविण्याचे पाप खुपसे यांनी राजकीय सुडबुध्दीने केले असून, आमचे नेते भरणे मामा यांची जाणीवपूर्वक बदनामी केल्याने तालुक्याचा स्वाभिमान दुखावला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची भावना अतिशय तीव्र असून,खुपसेंवर त्वरीत गुन्हा दाखल करावा. अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला. 

चौकट : राष्ट्रवादीचा झेंडा आणि दांडा मोर्चाची चर्चा 

इंदापूर तहसिल कार्यालयावर अतुल खुपसें यांचा मोर्चा येणार होता. तसे चॅलेंज त्यांनी इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिले होते. मात्र तत्पूर्वी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. खुपसें यांना पोलीस प्रशासनाने इंदापूरच्या पलीकडे भिमानगर येथेच रोखले, परंतु इंदापूर येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी  कार्यकर्ते यांनी , पक्षाच्या झेंड्याला ओल्या बाबूंचा दांडा लावून, 'झेंडा आणि दांडा' आंदोलन केल्याने, त्याची तालुकाभर चर्चा रंगली आहे. 


close