शिरूर कासार... 'पीएम रन फॉर स्किल' अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरूर कासार येथे मॅरेथॉन स्पर्धा तसेच पदवीदान समारंभ संपन्न झाला. अठरा वर्षांवरील महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र गटात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन योगगुरु डॉक्टर प्रीती बडे यांच्या हस्ते करण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेनंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण गटनिदेशक राठोड ए एफ यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण महावितरण अभियंता ललीत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. प्राचार्य ढवळे सर यांच्या शुभहस्ते पदवीदान करण्यात आले. यावेळी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिल्प निदेशक मनीषा महाले यांनी केले तर आभार एस ए बागडे यांनी मानले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरूर कासार संस्थेचे प्राचार्य गणेश हडतगुणे यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर एस डुमणे, कुटे एस एन, बडे एस एस ,वाघमारे डी के, संदिप विघ्ने, एल एस पाटील,डी बी पवार, प्रवीण धनवे, राजेंद्र विघ्ने यांनी प्रयत्न केले.

