shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मंडलीकवस्ती शाळेत मोठ्या उत्साहात दहीहंडी कार्यक्रम साजरा .

मंडलीकवस्ती शाळेत मोठ्या उत्साहात  दहीहंडी कार्यक्रम साजरा .
इंदापूर प्रतिनिधी: मंडलीकवस्ती शाळेत आज दिनांक 9/9/2023 रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात बालगोपाळानी दहीहंडी कार्यक्रम साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ घोळवे मॅडम यांनी केले, त्याच बरोबर १०० पेक्षा ज्यास्त पालकांच्या उपस्थितीत इयत्ता ४ थी तील मुलांनी गाण्यावर नृत्य सादर केले.सर्वांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला .
वेगवेगळे उपक्रम सादर करून त्याच बरोबर इंदापूर तालुक्यात तसेच जिल्ह्यात नाव लौकिक मिळवणारी शाळा म्हणून मंडलीकवस्ती शाळेचे नाव आजही प्रसिद्ध आज शाळेत 250 विद्यार्थी शिक्षण घेतात त्यामुळे शेजारच्या सातारा जिल्ह्यातून आसू या गावातून 30 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात.
शाळाव्यवस्थान समितीच्या मार्गदर्शनाखाली तसेच पालकांच्या सहभागातून ही शाळा आपला नावलौकिक आजही टिकवून आहे.
close