shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांना सन्मान.

रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या वतीने  शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांना सन्मान.  
 
सौ पुष्पा काळे मॅडम यांना रोटरी एक्सलन्स व्होकेशनल अवॉर्ड या सन्मानाने मानपत्र शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित
 इंदापूर प्रतिनिधी:रोटरी क्लब ऑफ इंदापूर च्या वतीने आज  ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांना सन्मान करण्यात आला. रोटरी क्लब इंदापूरच्या वतीने आज इंदापूर शहरातील तीन शाळांमध्ये जाऊन तेथील सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प व एक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी सर्वप्रथम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .त्यानंतर सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय या ठिकाणी सर्व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे त्याच विद्यालयाच्या सौ  काळे मॅडम यांना रोटरी एक्सलन्स व्होकेशनल अवॉर्ड या सन्मानाने मानपत्र शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आला .त्यांनी त्यांच्या तीस वर्षाच्या कालखंडामध्ये चांगल्या प्रकारची शिक्षण देण्याचे काम केले . त्यांना आतापर्यंत केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना या सन्मानाने रोटरी कडून गौरवण्यात आले आहे. त्यानंतर नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प आणि भेटवस्तू देऊन तुमचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष आझाद पटेल, रोटरी डिस्ट्रिक्टचे व्होकेशनल डायरेक्टर वसंतराव माळुंजकर ,रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वन चे मेंबरशिपचे को डायरेक्टर ज्ञानदेव  डोंबाळे, डिस्ट्रिक्ट फाऊडेशन टीमचे झोनल डायरेक्टर नरेंद्र  गांधी, डिस्ट्रिक्ट सिनर्जी टीमचे झोनल डायरेक्टर  राकेश गानबोटे, क्लबचे सचिव प्रशांत भिसे, क्लबचे खजिनदार भीमाशंकर जाधव, ज्येष्ठ सदस्य प्रमोद भंडारी, क्लब वोकेशन डायरेक्टर   धरमचंद लोढा  पुढील वर्षाचे अध्यक्ष मोरेश्वर कोकरे, मुख्याध्यापक संजयकुमार शिंगारे,सुनील  मोहिते, समीर सूर्यवंशी हे सर्व  कार्यक्रमाला उपस्थित होते..
close