लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी मध्ये शिक्षक दिन व रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना अभिरुप शिक्षक म्हणून अध्ययन- अध्यापनाचा अनुभव यावा,अध्यापन करताना विद्यार्थी प्रतिक्रियेचे महत्व समजावे यासाठी इ.१० वी व इ.१२ वी मधील विद्यार्थ्यांनी आज अभिरूप शिक्षकांची भुमिका बजावली.
इ.५ वी ते ११ वी पर्यंत सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचे काम अभिरूप शिक्षकांनी केले.
विद्यालयाचे प्राचार्य भिमराव आवारे सर व सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
*कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून सौ.तरंगे मॅडम यांनी शिक्षकाचे विद्यार्थी जीवनातील महत्व विशद केले. तसेच रक्षाबंधन सण फक्त एक दिवसासाठी साजरा न करता शाळा हे कुटुंब समजून विद्यालयातील सर्व मुलीं बहिणीच्या प्रमाणे रक्षा कराण्याची जबाबदारी प्रत्येक मुलाची आहे असे सांगितले.
*कार्यक्रमाचे अध्यक्ष भिमराव आवारे सर यांनी समता, बंधुता जोपासत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करावे असा संदेश दिला. "धागा कृतज्ञतेचा मातृभूमीच्या रक्षणाचा" या उपक्रमांतर्गत विद्यालयातील मुलींनी स्वतः बनवलेल्या ३०० राखी व २०० शुभेच्छा पत्र सीमेवरील सैनिकांना पाठवले होते. त्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थी मनोगतात कु.अश्णया इंगवले,श्रावणी फडतरे,श्रुष्टी सुद्रिक, श्रृती सावंत,सृष्टी सुद्रिक,शुक्रिया मारकड ,चि.शिवम देवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र रणमोडे सर , भिमराव खाडे सर,सौ.वर्षा जगताप मॅडम, सौ. मनिषा गायकवाड मॅडम यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सानिया मुलाणी व कु.गौरी फडतरे यांनी केले.

