मंगरूळ दस्तगीर : मा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ हर्षल क्षीरसागर यांचे आदेशान्वये आणि डॉ. प्रफुल्ल मरसकोल्हे वैद्यकीय अधिकारी, डॉ रावेकर मॅडम यांचे मार्गदर्शनात, क्लीन एअर फॉर ब्लू स्काय हा कार्यक्रम मंगरूळ येथील स्व.संतोषराव गोडे माध्यमिक विद्यालय येथे मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.
वायुप्रदूषण कश्याने होते, कोणकोणते आजार होतात आणि प्रदूषण रोखण्याकरिता काय उपाययोजना करायला पाहिजे. याची सविस्तर माहिती आरोग्य सहाय्यक धर्मा वानखडे आणि सीएचओ संदीप दुबे यांनी उपस्तित विद्यार्थी व शिक्षकांना दिली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एम.बी. देशमुख आणि इतर शिक्षकवृंद हजर होते.

