shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला न्याय द्या आणि सरसगट कुणबी-मराठा शासन अध्यादेश लवकरात लवकर काढा-शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील


अ.नगर:- मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबार कशासाठी केला गेला याची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी.


सरसगट कुणबी-मराठा आरक्षण संदर्भात तात्काळ अध्यादेश जारी करण्यात येवुन मराठा समाज बांधवांवर वेळोवेळी होणारा अन्याय दुर करावा. मराठा आंदोलकांवर वेळोवेळी दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत. संपुर्ण जगभरातील नागरिकांनी दखल घेतली असे ५८ मोर्चे शांततेत झालेले असताना प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात महाराष्ट्र बंद / उद्रेक होण्याची वाट बघु नये. इथुन पुढे कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना सकल मराठा समाजाचा पाठिंबा असून मागण्यादेखील रास्त आहेत. जवळपास मागील ६० वर्षांपासून सकल मराठा समाज आरक्षणापासून उपेक्षित असून स्वर्गीय क्रांतीसुर्य आण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून सुरु झालेला सकल मराठा समाजाचा शांतता, संयमाचे प्रतीक असे ५८ भव्य दिव्य मोर्चाची दखल राज्यकर्त्यांनी न घेता जाणीवपुर्वक मराठा समाजावर एकप्रकारे अन्यायच केलेला असून मनोज जरांगे यांच्या माध्यमातून सकल मराठा समाजाला न्याय मिळेल हीच अपेक्षा आहे. 

मराठा समाज आरक्षणापासून वंचित असून मनोज जरांगे यांच्या सुरु असलेल्या आमरण उपोषणास शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे. 

पूर्वीच्या काळी शेतकरी म्हणजे कुणबी तर मग आज शेती करणाऱ्या मराठयांचे पूर्वज हे शेतकरीच होते तरी सर्वच मराठा बांधवाना कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देऊन सदरचा प्रश्न कुठलाही वेळ काढूपणा न करता तात्काळ मार्गी लावणे गरजेचे असून सकल मराठा समाज बांधवांचा अंत  न पाहता न्याय द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी केली आहे.
close