श्रीरामपूर प्रतिनिधी:
माजी आ.भानुदास मुरकुटे संस्थापक असलेल्या अशोक कारखाना संलग्न ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अशोकनगर येथे डी.फार्मसी महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रिया २९ सप्टेंबरपर्यत असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संस्थेचे सहसचिव भास्कर खंडागळे व कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, यावर्षीपासून डी.फार्मसी महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे. सुसज्ज इमारत, शिक्षणाच्या आधुनिक सुविधा, अनुभवी अध्यापक वर्ग, सुविधायुक्त क्लासरूम, प्रयोगशाळा, स्कूल बसेस, मुला-मुलींचे स्वातंञ वसतीगृह व मेस, क्रिडांगण, क्रीडा प्रशिक्षक अशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
प्रवेशासाठी अंतिम मुदत २९ सप्टेंबर २०२३ अशी आहे. प्रवेशाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरी बारावी सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश व अधिक माहितीसाठी फार्मसीचे प्राचार्य प्रसाद कोते (९०४९७८३७६०) किंवा पाॕलिटेक्निकचे प्राचार्य अंजाबापू शिंदे (९८५०१८५७२१) यांचेशी संपर्क करावा, असे श्री.खंडागळे व सौ.मुरकुटे यांनी सांगितले.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

