shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बी.एस.एन.एलचे लोखंडी पाईप चोरी करणारे चोरट्यांना अटक भिंगार कॅम्प पोलीसांची कामगिरी



 भिंगार कॅम्प पोलीसांची कामगिरी

 प्रतिनिधी :  महेश चव्हाण 

नगर : 1 2 /       दि . 11 सप्टेंबर रोजी श्री. सोमनाथ रानबा जगताप, उपमंडल अभियंता बीएसएनएल यांनी फिर्याद दिली कि, एक्सर्टनल विभागातील नगर सोलापुर रोड वरील मुठ्ठी चौकाजवळील पुलाच्या ओढयामध्ये 20 फुट लांबी व 6 इंच रुंदीचा जि.आय. लोखंडी पाईप कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेले आहे. वगैरे मजकुर ची फिर्याद दिली असता त्यावरून भिंगार कॅम्प पो स्टे गुरनं 590/2023 भादविक 379 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हा दाखल झाले नंतर आरोपी हे अनोळखी होते. मा. अपर पोलीस अधिक्षक सो, अहमदनगर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, नगर शहर विभाग, अहमदनगर यांनी दिलेले सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि डी. एस. मुंडे यांनी स्वतंत्ररित्या पथक तयार करुन पथकास योग्य ते मार्गदर्शन करुन गोपनीय बातमीदार तयार करुन तपास केला असता आरोपी नामे 1) रोहीत अशोक गायकवाड वय-352) अनिकेत सुनिल पारधे वय 25 3) तेजस मायकल जाधव वय 21 सर्व रा. सातखोल्या,नगर कॉलेज शेजारी, पावर हाऊस जवळ, अहमदनगर हे बीएसएनएल चे पाईप व्हेक्स ब्लेडने कापुन चो-या करत असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपींचा पथकातील अंमलदार यांनी तात्काळ शोध घेवून स्टेशन रोड परीसरात आरोपी असल्याची माहिती मिळाल्याने आरोपींना पोलीस आल्याचा सुगावा लागताच ते पळुन जाण्याचे तयारीत असतांना आरोपींना ताब्यात घेवुन विचारुपस केली असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्हयातील चोरी केलेले जि.आय. लोखंडी पाईप काढुन दिल्याने ते जप्त केलेले आहेत. सदर गुन्हा दाखल झाले पासुन अवघ्या 24 तासात आरोपींचा शोध घेवून आरोपींकडुन गुन्हयातील गेला मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. खैरे सो, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कातकडे सो, यांचे मार्गदर्शना खाली भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, सफौ/ के. बी. सोनार, पोहेकॉ / संदीप घोडके, पोहेकॉ / रेवननाथ दहिफळे पोना / दिपक शिंदे, पोकॉ/ अमोल आव्हाड, पोना / सचिन गोलवड यांनी केली आहे.
close