प्रतिनिधी : महेश चव्हाण
नगर : ८ / "मानद डॉक्टरेट" ही पदवी, महाराष्ट्र रत्न व अहमदनगर भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल स्नेहबंध चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा भिंगार कॅम्प येथील क्राईस्ट चर्चमध्ये नाशिक धर्मप्रांतचे बिशप रा. रेव्ह. शरद गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. उद्धव शिंदे हे रस्त्यावर फिरणाऱ्या व फुटपाथवर झोपणाऱ्या गरजू व अनाथांना मदत करतात, तर विविध शासकीय कार्यालये, शाळा, कॉलन्यांमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावत आहेत. गरजू रुग्णांसाठी आरोग्य शिबिरे, गोरगरीब मुलांसाठी शालेय साहित्याचे वाटप, महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गौरी गणपती स्पर्धेचे आयोजन, असे विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम डॉ. शिंदे राबवतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना "मानद डॉक्टरेट" ही पदवी, महाराष्ट्र रत्न व अहमदनगर भूषण हे पुरस्कार मिळाले. त्यांचा क्राईस्ट चर्च तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रिस्ट इन्चार्ज रेव्ह. डॉ. जॉन प्रभाकर, ब्रिगेडियर रसल डिसूजा, नीलेश कमलकर, दीपक कमलकर आदी उपस्थित होते.

