shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजकारणात कुठे थांबायचं आणि कुठे चालायचं ज्यांना समजतं तेच सर्वात यशस्वी होतात - आ . दत्तात्रय भरणे.

राजकारणात कुठे थांबायचं आणि कुठे चालायचं ज्यांना समजतं तेच सर्वात यशस्वी होतात -    आ . दत्तात्रय भरणे.                             
इंदापूर प्रतिनिधी :  ज्या माणसाला आयुष्यात समजत ना कुठे थांबायचं आणि कुठे चालायचं ते राजकारणात सर्वात यशस्वी होतात. मला त्याचा कुठेतरी अनुभव आला आणि त्यामुळे कदाचित आमदार, मंत्री होता आलं असे इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब- वालचंदनगर येथे उपप्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ अरुण कांबळे यांचा सेवापूर्ती समारंभ मध्ये (दि.२ सप्टें)  मा. राज्यमंत्री तथा  आ. दत्तात्रय भरणे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना म्हणाले.                            यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आनंदी (काकी) विश्वासराव रणसिंग या होत्या. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव वीरसिंह रणसिंग, खजिनदार हनुमंतराव रणसिंग, विश्वस्त शिवाजीराव रनवरे ,कुलदीप हेगडे, वीरबाला पाटील, प्रा. डॉ. अंकुश आहेर व  दत्तात्रय फडतरे , विद्या सावंत ,सागर मिसाळ, योगेश डोंबाळे, राजेंद्र डोंबाळे, अतुल सावंत, श्रीपती चव्हाण, जयंत मोरे, रामभाऊ रणसिंग, शंकर रणसिंग, विनोद रणसिंग, नंदकुमार रणवरे, हर्षल रनवरे, भगवान रणसिंग ,वैभव गीते, सुरज वनसाळे, आत्माराम लोंढे, हनुमंत पोळ, गोरख शेळके, सुनील मोरे, बि.के. सर्वगोड, चंद्रकांत रणवरे, सिद्धेश्वर रणसिंग, मंगेश निंबाळकर,प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.       याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अंकुश आहेर,  रामभाऊ कदम ,सुहास डोंबाळे ,अभिजीत रणवरे, प्राची कांबळे, कल्याणी कांबळे तसेच इतर काही मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .  

 याप्रसंगी आ. भरणे म्हणाले की, ज्या माणसान  घडवलं, सहकार्य मदत केल . जगायला शिकवलं ,समाजासमोर सामोरे जाण्यासाठी शिकवलं. त्या माणसाला त्या गुरुजनांना कधी विसरायचं नाही. राजकारणामध्ये जिरवा जिरवी असतात परंतु शिक्षण क्षेत्र वेगळं असतं. प्रत्येक शिक्षकाला  वाटतं की माझा विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठा व्हाव. जेणेकरून शिक्षकांचं, संस्थेचं शाळेचं नाव काढतील हे प्रत्येकाची भावना असते . कै. विश्वासराव (दादा )रणसिंग, अण्णा या संस्थेची जुनी मंडळी यांनी ही संस्था काढली या सर्वांचे आभार मानले पाहिजे. या वालचंदनगर भागातील मुलांना मुलींना एसटीची खूप अडचण होती. या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एसटीला पैसे नसत त्यामुळे शिक्षण होऊ शकत नव्हते. त्याकाळी ही संस्था काढली आणि या भागातील विद्यार्थी घडले. आयुष्यात जेवढं चांगला करता येईल, तेवढं चांगलं केलं पाहिजे .आपल्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात त्रास होईल हे कधी करायचं नसतं .शिक्षकांनी असं काम करा की समाजाने आयुष्यात नोंद घ्यावी . या शाळेला मदत करणं म्हणजे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारची इमारत सुविधा मिळाली पाहिजे हीच भावना आहे. राजकारणात कुठेतरी मागे पुढे सरायचं असतं. आपण दोन पायुल मागे तर दोन पाऊल पुढे टाकायचे असतात. ज्या माणसाला आयुष्यात समजत ना कुठे थांबायचं आणि कुठे चालायचं ते राजकारणात सर्वात यशस्वी होतात. मला त्याचा कुठेतरी अनुभव आला आणि त्यामुळे कदाचित आमदार, मंत्री होता आलं. सुखाला हुरळून जायचं नसतं आणि दुःखाला घाबरायचं नसतं. जी माणसं आयुष्यात प्रत्येक गोष्टीला सामोरे जात असतात आणि  तीच खरी माणसं असतात. आपल्या संकटाच्या दुःखाच्या काळी माणसं आपल्याला मदत करतात ती आपली असतात. आयुष्यात  आपलं आई-वडील हेच आपले मोठे असतात. प्रत्येक आई-वडिलांना वाटते की आमच्या वाट्याला जे दुःख आले ते आमच्या मुलांना येऊ नये. ते काम प्रा. डॉ. अरुण कांबळे सरांनी पूर्ण केले आहे. जी माणसं दुःखातून अडचणीतून पुढे जातात त्यांना खरा आनंद घेता येतो. तसेच यावेळी आ .भरणे म्हणाले की,ज्या विद्यार्थ्याला घडवलं त्या विद्यार्थ्यावर थोडं लक्ष द्या असं मिस्कीलपणे विनंती केली. माझे गुरु ज्या शाळेत शिकले त्या गुरुच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमा  प्रसंगी गुरुकडून त्या शाळेला २५ लाख रुपये मंजूर केले जातील असेही आश्वासन कळंब विद्यालयासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिले.                   
यावेळी संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी आ. दत्तात्रय भरणे यांना उद्देशून म्हणाले की, मामा आपल्याबद्दल बोलायचे झाले तर हा परिसर दिसतोय तो २००७ - ०८ साली आम्हाला प्रश्न पडला होता की काय करायचं ? त्यात २०१३ साली दादांचे निधन झालं. २०२०साली अण्णासाहेबांचे निधन झालं. खरंतर ही गेल्यानंतर संस्थेच्या पाठीचा कणा मोडल्यासारखं झालं होतं. परंतु आपण मामा आमच्या संस्थेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आणि संस्थेचा वटवृक्ष झालेला दिसतो अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती प्रा. डॉ. अरुण कांबळे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हटले की, माणसातला राजा आणि राजातला माणूस कसा असावा हे मामा तुमच्यामुळे आम्हाला लक्षात येते. लोक राजा नेमकं काय आहे हे मामा मुळे या ठिकाणी लक्षात येते. संपत्ती आहे परंतु गर्व नाही. विकास आणि विकास हेच मामांचं काम आहे. मामांनी जात, पंथ, धर्म बघितले नाही. तुमचे विचार जर या ठिकाणी चांगले असतील तर तुम्ही निश्चितच त्यामध्ये त्याच्यामध्ये मोठे होत जाता. जी वलय आहेत ती तोडत जाता. आणि चांगल्या उच्च पातळीवर त्याच्यामध्ये विराजमान होत जाता. याच पद्धतीने हे माझं महाविद्यालय पुढे चाललेलं आहे. मामा तुम्ही अशाच पद्धतीने आणखीन राजकारणात पुढे जात जावो ही सदिच्छा तसेच आज माझ्या सेवापूर्ती सत्कार समारंभ प्रसंगी माझा आदर सत्कार केला त्या सर्वांचे मनापासून आभार आशा शब्दात त्यांनी आपले मनोगत पर भाषण व्यक्त केले.
close