shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ.रविंद्र कुटे यांनी आय.एम.ए. महाराष्ट्राला उंचीवर नेले - मा. आ. डॉ.सुधीर तांबे


संगमनेर प्रतिनिधी:
डॉ.रविंद्र कुटे यांनी आय.एम.ए. साठी गेली २५ वर्ष सातत्याने अनेक पदावर काम करुन वेगळ्या उंचीवर नेले असे गौरवोदगार पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले. आय. एम ए. संगमनेरच्या नवीन कार्यकारणीच्या पदग्रहण समारभात ते मार्गदर्शन करताना बोलत होते.

आय. एम. ए. संगमनेर आणी डॉ. रविंद्र कुटे यांचा घनिष्ट संबंध आहे. आम्ही दोघे बी. जे. मेडिकल ला एकाच यूनिट मधे सर्जरी शिकलो. डॉ. कुटे हे मेहनती, कष्टाळू, एकनिष्ट कार्यकर्ते आय. एम. ए. चे आहेत. त्यांनी स्वतः ६७ शाखा काढल्या असून सदस्य संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. दत्तक खेड़ी योजनेत १६३ गावे दत्तक घेण्यात प्रोत्साहन दिले आहे. महाराष्ट्रातील सर्व शाखेत जाणारे ते एकमेव अध्यक्ष आहेत. ग्रामीण भागात आय. एम. ए. वाढविण्यासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले आहेत.

शिर्डी येथे सातत्याने ११ वर्षे राज्य व राष्ट्रीय परिषदांचे नियोजन त्यांनी केले असल्याचे ते म्हणाले.
यावेळी नूतन अध्यक्ष डॉ. योगेश गेथे, सचिव डॉ किशोर गाढवे, खजिनदार डॉ. निकुंज दातीर यांचा शपथविधि पार पडला.

सहयोगी:
पत्रकार लियाकतखान पठाण - संगमनेर 

संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close