shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रा.दिलीप सोनवणे यांच्या इरसालनमुने 'पुस्तकाचे रविवारी प्रकाशन


श्रीरामपूर प्रतिनिधी:
प्रा.दिलीप सुखदेव सोनवणे लिखित 'इरसाल नमुने 'या ललितगद्य विनोदी ग्रामीण व्यक्तिचित्रे पुस्तकाचे प्रकाशन मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी प्राचार्य टी. ई. शेळके, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रकाशक डॉ. शिवाजी काळे, सुखदेव सुकळेसर, प्रा. शिवाजीराव बारगळ, शिवव्याख्याते प्रा. एस. झेड. देशमुख, आयुक्त रवींद्र साठे, साहित्यिक सुनील गोसावी, सी.ई.ओ. वसंत खोकले, मा. नगरसेवक कैलास वाकचौरे आदींच्या उपस्थितीत येत्या रविवारी प्रकाशन होणार असून याप्रसंगी उपस्थित राहवे असे आवाहन लेखक प्रा.दिलीप सोनवणे यांनी केले आहे.
संगमनेर येथील गुंजाळवाडी ग्रेप्स गार्डनमध्ये १० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. स्व. सुखदेव पांडुरंग सोनवणेगुरुजी यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त पुस्तक प्रकाशन, परिसंवाद आणि मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीरामपूरचे आसरा प्रकाशनच्या प्रकाशिका  सौ. मोहिनी शिवाजी काळे, लेखक प्रा. दिलीप सोनवणे,सौ. छाया सोनवणे, डॉ.आशिष सोनवणे, डॉ.विशाखा सोनवणे, संकेत सोनवणे, सौ.प्राजक्ता सोनवणे आदिंनी केले आहे.

वृत्त विशेष सहयोग
प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये (सर)

संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close