shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भरतशेठ शहा चषक दहीहंडी स्पर्धेस इंदापूरकरांची लाक्षणिक उपस्थिती.

भरतशेठ शहा चषक दहीहंडी स्पर्धेस इंदापूरकरांची लाक्षणिक उपस्थिती.

प्रथमच दहीहंडी सोहळ्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थित आली दर्शवून.
इंदापूर प्रतिनिधि: इंदापूर शहरात अतिशय शिस्तबद्ध  दहीहंडी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सव सोहळा पार पडला. हा महोत्सव सोहळा पाहण्यासाठी इंदापूरकरांची लाक्षणिक उपस्थिती दर्शवणारी सर्वोत्तम दहीहंडी सोहळा दिसून आला.
  
इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, तथा कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या मित्र परिवाराच्या वतीने शुक्रवारी (१५ सप्टेंबर) सायंकाळी भव्य दहीहंडी स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवाने एक आदर्श घालून दिला. महिला व पुरुषांची प्रचंड गर्दी, रशियन कलाकार आणि सिने अभिनेत्रींच्या साक्षीने पार पडलेल्या या उत्सवात इंदापूरकरांनी चांगलीच पाहण्यासाठी प्रचंड स्वरूपात हजरी लावली. या स्पर्धेत इंदापूर शहरातील महात्मा फुले संघाने सहा मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडून आपला मान मिळवला. यावेळी उपस्थित गोपालांनी डीजेच्या तालावर धरलेला नृत्याचा ठेका आणि  जल्लोष पाहण्यासारखा होता. या सोहळ्यात भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने इंदापूरकरांना मनोरंजनासाठी रशियन कलाकारांच्या फायर शो'चे
 आयोजन करण्यात आले होते. तसेच  सिनेअभिनेत्री स्मिता गोंदकर, अभिनेत्री शीतल पाटील आणि प्रसिद्ध अँकर व अभिनेत्री मुग्धा ठाकूर यांची उपस्थिती इंदापूरकरांसाठी अतिशय पर्वणीची ठरली. दरम्यान दहीहंडी व सांस्कृतिक कार्यक्रमापूर्वी नेत्र दीपक अशी भव्य रॅली ही या कार्यक्रमाची जोरदार सुरुवात ठरली.

या कार्यक्रमास पिडीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव विधितज्ञ राहुल मखरे, पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप, माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप  जगदाळे, काँग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस जकिर काझी, युवा नेते अमर जगदाळे,बीआरएसचे तालुकाध्यक्ष निवास शेळके,  शहा परिवारातील सदस्य व इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुकुंद शहा, अंगद शहा,  माजी नगरसेवक पोपट शिंदे, माजी नगरसेवक व गटनेता गजानन गवळी,  आरपीआयचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी मखरे, आरपीआयचे पुणे जिल्हा सचिव संदीपान कडवळे, अर्शद शिवशाही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन आरडे, लकी ग्रुपचे जावेद शेख,बीएस ग्रुप अध्यक्ष बंटी सोनवणे, बंडू चव्हाण, प्रमोद राऊत, सुनील तळेकर, गणेश महाजन, प्रशांत उंबरे, विशाल चव्हाण, अक्षय सूर्यवंशी यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यवसाय क्षेत्रातील अनेकजण या कार्यक्रमास उपस्थित होते.
close