shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तिखी येथे कृषीकन्यांकडून बोर्डोक्स पेस्टचे प्रात्यक्षिक.

तिखी येथे कृषीकन्यांकडून बोर्डोक्स पेस्टचे प्रात्यक्षिक.
शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा:तिखी येथे लिंबूवर्गीय बागांची मोठ्या प्रमाणात होणारी लागवड लक्षात घेता डॉ.शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामतीच्या विद्यार्थिनींकडून बोर्डोक्स पेस्टचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
भविष्यात खोड कीड व बुरशीजन्य रोगांपासून फळझाडांना संभावणाऱ्या धोकांपासून प्रतिबंधकात्मक उपाय म्हणून बोर्डोक्स पेस्टचा वापर कसा करावा याबाबत कृषीकन्यांकडून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.तसेच बोर्डो पेस्ट बनवण्याची अचूक पद्धत, योग्यता तपासणी चाचणी व वापरताना घ्यावयाची काळजी याबद्दल सांगण्यात आले.
या वेळी प्रात्यक्षिकाला भरपूर प्रतिसाद प्रतिसाद मिळाला .कृषी कन्या तेजस्विनी मारकड,वर्षा पांढरे , शिवांजली रणवरे, मंगल दिवटे ,वैष्णवी गायकवाड ,अपेक्षा हरगुडे, आरती जाधव यांचे गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात आले .या प्रत्यक्षिकासाठी अध्यापक शेंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
close