shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजापूरमध्ये शिक्षकदिनी अनोख्या पध्दतीने से.नि. शिक्षकांचा सत्कार



संगमनेर प्रतिनिधी:
तालुक्यातील राजापूर येथे ५ सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून गावातील सेवानिवृत्त शिक्षकांचा त्यांच्या घरी जाऊन त्यांना शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

अशा अनोख्या पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे,खरे तर प्रत्येक गांवा/शहरात असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे,शिष्य,गुरु हे नातं सर्वश्रेष्ठ आहे,गुरुंमुळेच मनुष्याला जीवनाचा खरा मार्ग मिळतो. आणी गुरुंच्या प्रती शिष्यगणांची कृतज्ञता जपताना मोठा आनंद मिळून येतो असेही याप्रसंगी आयोजकांनी सांगितले.
यावेळी गावातील उत्तमराव देशमुख , प्रभाकरराव देशमुख , वसंत नवले, रघुनाथ नवले , सुखदेव भाऊ हासे , पंढरीनाथ जाधव, रामनाथ पवार, चौधरी मॅडम, पठारे मॅडम ,अण्णासाहेब दातीर, सलीम पठाण ,श्रीधर घोडेकर ,आनंदा हासे,जिजाबा हासे ,यादव जाधव, वसंत डांगळे, बाळासाहेब गायकर आदि सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार पंचायत समितीचे माजी सदस्य माधव रामभाऊ हासे, ग्रामपंचायत पंचायत सदस्य रमेश जाधव , संभाजी हासे, गोरख खतोडे ,वसंतराव देशमुख ,सुधीर हासे यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आले.

सहयोगी:
पत्रकार लियाकतखान पठाण - संगमनेर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close