सोलापूर : रविवार दि. 22 ऑक्टोबर 2023 रोजी सोलापूर लेबर फेडरेशन ऑफिस, जि.प. समोर तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन -23 पूर्वतयारी बैठक मा. प्रा. शशिकांत जाधव, मंगळवेढा, सोलापूर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सदर बैठकीस प्रमुख पाहुणे - मा. श्री. शंकर अण्णा चौगुले, सोलापूर, विशेष उपस्थिती - मा. श्री. टी. एस. चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक - संभाजीनगर, मा. श्री. शामराव पवार, सेवानिवृत्त - गट शिक्षणाधिकारी, बुलढाणा उपस्थित होते.
मा. श्री. रवि देवकर, (शिक्षक) सोलापूर यांनी उत्कृष्ट सुत्रसंचालन आणि प्रास्ताविक मा. श्री. शांताराम मनवरे, पुणे यांनी केले. त्यावेळी उपस्थित पाहुण्यांचे व मा.श्री. शंकर अण्णा चौगुले, सोलापूर यांचा पुरस्कार मिळाल्या बद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर बैठकीत पुणे शहरात यापूर्वी दोन वेळा साहित्य संमेलन झालेले असल्याने महाराष्ट्रात इतर ठिकाणी साहित्य संमेलन व्हावे, असे अनेकांनी आपले मत व्यक्त केले.*
त्यावर बैठकीत विचार विनिमय करून 17 डिसेंबर 2023 रोजी वडार समाजाचे बुलंद आवाज मा. श्री. विजयदादा चौगुले यांचे नेतृत्वाखाली " वडार अस्मिता दिन " सोलापूर येथे साजरा करण्यात येणार असून त्यादिवशी त्यांचे प्रमुख उपस्थितीत सोलापूर येथे तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन - 23 आयोजित करण्यात यावे, त्याचे यजमान पद घेण्यास मा. श्री. शंकर अण्णा चौगुले, प्रदेश उपाध्यक्ष - मी वडार महाराष्ट्राचा संघटना तयार असल्याचे तसेच साहित्य संमेलनात सौंगुल लोकगीत समावेश असावा आणि साहित्य संमेलनात वडार समाजाचे हभप अण्णाप्पा महाराज, हभप लक्ष्मण महाराज यांचे नाव विचारात घ्यावे, आपल्या बोलीभाषेचा अधिक वापर करावा, अशी सुचना केली.
अखिल वडार बोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. टी. एस. चव्हाण यांनी सोलापूर साठी संमती दिली असून लवकरच त्यावर साहित्य मंडळ कार्यरकारणी बैठकीत चर्चा करून पुढील वाटचाल करता येईल, असे बैठकीत सांगितले आहे.
बैठकीच अध्यक्ष - मा. प्रा. श्री. शशिकांत जाधव सर यांनी सोलापूर हे ऐतिहासिक हुतात्म्याचे व संताचे ठिकाण असून पुण्यानंतर सोलापूर मध्ये वडार समाज मोठया संख्येने असल्याने आगामी तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन - 2023 सोलापूर मध्ये करण्याबाबत साहित्य मंडळास शिफारस केली.
सदर बैठकीस मा. शाहिर श्री. गंगाराम नलावडे, इचलकरंजी, मा. श्री. रमेश जेठे,अहमदनगर, पुणे येथून मा. श्री. अशोक पवार, मा. श्री. शांताराम मनवरे, मा. श्री. हरिष बंडीवडार, सोलापूर येथील मा. श्री. मनोहर मुधोळकर, मा. श्री. राजू अण्णा चौगुले, मा. श्री. अप्पाराव इटेकर, मा. श्री. रवि (boss) शिंदे, मा. श्री. विष्णू चौगुले, मा. श्री. षण्मुखानंद दाते, मा. श्री. औदुंबर धोत्रे, मा. श्री. रवि देवकर, मा. श्री. सुनिल शिंदे, मा. श्री. सुरेश विटकर, मा. श्री. राजू निंबाळकर, मा. श्री. काशिनाथ आनंदकर, मा.श्री. लहु बंदपट्टे इ. मान्यवर उपस्थित होते.
सदर बैठकीचे व स्नेह भोजनाची उत्कृष्ट नियोजन व्यवस्था सोलापूरकर यांनी उत्तम केली होती.
लेखन तथा प्रसिद्धी
हरिष बंडीवडार
सहकार्याध्यक्ष
अखिल वडार बोली साहित्य मंडळ, पुणे

