प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:-
मराठा आरक्षण प्रश्नी व मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात केज येथे महिलांनी कॅण्डल मार्च काढला.यामध्ये महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी मार्ग रॅली काढून भावना व्यक्त करण्यात आल्या. कँडल मार्च मध्ये प्रचंड घोषणाबाजी झाली.
आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं म्हणत समाज एकवटला.आरक्षण मागणी तात्काळ मंजूर करावी अशी मागणी मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी केली.

