रोजचे हे चालणे अन!
सोबतीला चांदणे
रानवारा झोंबणारा
चाललो मी हो कुठे?
पौर्णिमा ही रोजची अन
सोबतीला चंद्र आहे
गंध आगळा रानी पसरे
चाललो मी हो कुठे?
आजचा तर चंद्र आगळा
परवणी कोजागिरी
टिपूर वेचित चांदण्यांना
चाललो मी हो कुठे?
रचनाकार : चंद्रकांत शहासने, पुणे
९८८१३७३५८५

