कोणाचे सहकारी, बंधू,भाऊ,मुलगा, म्हणून सातत्याने साठेनगर परिसरात सामाजिक काम करीत असलेले माजी नगरसेवक आणि भावी नगरसेवक आमचे मित्र म्हणजेच दादासाहेब सोनवणे - प्रवीण माने
माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांचा वाढदिवस विवीध सामजिक उपक्रमातून साजरा.
इंदापूर प्रतिनिधि: कधी कोणाचे सहकारी, बंधू,भाऊ,मुलगा, म्हणून सातत्याने या साठेनगर परिसरात सामाजिक काम करीत असलेले माजी नगरसेवक आणि भावी नगरसेवक आमचे मित्र दादासाहेब सोनवणे यांचा जन्म दिवस यानिमित्ताने आपण जमलो आहोत. समाज्यामध्ये पैसे वाली माणसे खूप आहेत. पैसां सगळ्याकडे येतो. लक्ष्मी येते जाते. ती कोणा एकट्याकडे राहत नाही .तो व्यक्ती कसा वागतो , राहतो त्याचे सस्कांर , आचार विचार काय आहेत. त्याच्याकडे संपत्ती राहती. संपत्ती असली,नसली तरी ही माणसाने जमिनीवर असल पाहिजे याचे उदाहरण म्हणजे दादासाहेब सोनवणे आहेत. परिस्थिती जरी बरी असली तरी या परिस्थिती मध्ये सुद्धा समजा मध्ये काही तरी केले पाहिजे. समजातील दुःख कमी केले पाहिजे. समजाला मदत केली पाहिजे असे दादासाहेब यांच्या मनात येते अशा शब्दात प्रवीण माने यांनी दादासाहेब सोनवणे यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव केला.
इंदापूरचे माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांचा वाढदिवस इंदापूर येथे विवीध सामजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला.साठेनगर येथे दुर्गामाता नवरात्र उत्सव ठिकाणी शंभर कुटुंब यांना डजबिन माजी सभापती जिल्हा परिषद पुणे प्रवीण माने यांच्या हस्ते मोफत वाटप करून जाहीर सत्कार करीत केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी माझी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) इंदापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, अशोक मखरे,शिवसेना शहर अध्यक्ष अशोक देवकर ,तसूब सैय्यद, प्रा. डॉ.अमोल उनाळे सर,विकास शिंदे,माळी समाज अध्यक्ष , ललेंन्द्र शिंदे, बाळासाहेब अडसूळ,राजू मुळीक, चंदु सोनवणे,बाळासाहेब क्षिरसागर,सुभाष ननवरे, प्रवीण ननवरे,साईराज ढावरे , रणजीत ढावरे, विशाल ढावरे, आप्पा खंडागळे, आकाश कसबे, शंकर भिसे, इत्यादी उपस्थित होते.
तसेच श्रावणबाळ आश्रमातील मुलांना मिठाई वाटप केले. इंदापूर शहरातील व्यांकेटेश मित्र मंडळ, महात्मा फुले मित्र मंडळ कसबा, साईराज ढावरे मित्र परिवार, प्रवीण ननवरे मित्र परिवार व संत रोहिदास मित्र मंडळ, इंदापूर संघर्ष समिती , मुकभधिर शाळेचे शिक्षक प्रा. डॉ. उनाले सर मित्र परिवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट , लोकमान्य नगर येथील होलार समाज संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष राजू मुळीक मित्र परिवार, बिभिषण देवकर, लक्ष्मण खाबले,भाऊसाहेब गलांडे हिंगणगाव, बाळासाहेब क्षिरसागर मित्र परिवार, सकल मांतग समाज मित्र परिवार यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार, पुष्प गुच्छ, फेटा देऊन केक कापून मोठया संख्येने साजरा करण्यात आला.

