प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज मतदारसंघातून सावरगाव घाट येथे लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचे विचारचे सोने लुटण्यासाठी लाखो कार्यक्रते केज मतदारसंघातून दरवर्षी प्रमाणे जाणार आहेत. केज मतदारसंघाच्या आ. नमिता अक्षय मुंदडा व जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत भगवानबाबांच्या सावरगाव घाट येथील मेळाव्यासाठी जाणाऱ्या कार्यक्रत्यांचे नियोजन करण्यासाठी प्रमुख कार्यक्रत्यांची बैठक शासकीय विश्रामगृह केज येथे पार पडली.
या बैठकीत जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल व शहर येथील मेळाव्यासाठी जाणाऱ्या कार्यक्रत्यांच्या नियोजनाची जबाबदारी प्रमुख कार्यक्रत्यांवर टाकण्यात आली आहे.
सदर बैठकीस डॉ. वासुदेव नेहरकर, भगवान केदार, सुनील गलांडे,, मुरलीधर ढाकणे, अरुण चाटे, राहुल गदळे, बाबा चौरे, सत्यनारायण चौरे, प्रशांत केदार, श्रिहारी धस, सुरेश केकाण, प्रकाश मुंडे, अंकुश कलानी, डॉ. धनराज पवार, लक्ष्मण राख, विशाल जाधव, धीरज वनवे सह असंख्य प्रमुख कार्यक्रते उपस्थित होते. डॉ. वासुदेव नेहरकर यांच्या वर नियोजनाच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली.

