shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जरांगेपाटलांच्या सभेसाठी केज मध्ये आयोजित अन्नदान व्यवस्थेतून मराठा आंदोलकांची आ. नमिता मुंदडा कडून सेवा..

  ...............................................................................................
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-                              

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराठी येथे होणाऱ्या सभेसाठी आ. नमिता अक्षय मुंदडा, आतुल इंगळे, सुरेश नांदे सर यांनी सभेसाठी जाणाऱ्या मराठा समाज बांधवांसाठी पोहे, तुपातील शिरा, शाबुदाना खिचडी, बिसलरीपाणी बॉटल , केळी व चहाचे तर सभेहुन परतणाऱ्या मराठा समाज बांधवांना खिचडी, केळी व बिसलरीपाणी बॉटल सेवा ठेवली होती. या सेवेचा फार मोठ्या प्रमाणात जवळपास दहा हजार मराठा आंदोलकांना लाभ झाला. व ही सेवा करुन आपण समाधानी झालो आहोत असे आज पहाटे ४ वाजल्यापासून राञी दहा वाजेपर्यंत मराठा समाजाचे सेवेकरी म्हणून सेवा करणारे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी व्यक्त केली.                

 ( व्हिजन ट्रान्सफॉर्मर कंपनी) बीड रोड केज येथे झालेल्या या कार्यक्रमाचा लाभ नांदेड, लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यातून जरांगेपाटील यांच्या सभेसाठी जाणाऱ्या सर्व मराठा बांधवांना झाला.                                       हा 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंदडा गटाचे कट्टर समर्थक अतुल इंगळे, सुरेश नांदे सर, केज विधानसभा प्रमुख शरद इंगळे, महादेव मस्के, महादेव सुर्यवंशी, प्रकाश मुंडे, सुनील घोळवे, संतोष जाधव, दत्ता सावंत, डॉ. संभाजी वायबसे, राहुल गदळे, खदीर खुरेशी, मोबीन शेख, शकिल सय्यद, प्रशांत अदनाक ,दिपक मुळे, हाकिम शेख, संदीप सोनवणे ,प्रकाश जाडकर व असंख्य स्वंयसेवकानी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आंदोलकांची अन्नदान उपक्रमातून सेवा केली.
close