श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील श्री.गुरुमाऊली सेवाभावी संस्था संचलित माऊली वृद्धाश्रमाचा सहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, याप्रसंगी श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माजी सैनिक व तालुक्यातील माजी सैनिकांचा आचार्य विद्यावाचस्पती ह, भ ,प डॉक्टर शुभम महाराज कांडेकर यांच्या शुभ हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला, याप्रसंगी माजी प्राचार्य टी.ई. शेळके सर, डॉ .बाबुराव उपाध्ये, सुकळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शुभेच्छा व्यक्त करताना टी. ई शेळके सर म्हणाले की, आपण आज आपल्या देशामध्ये सुखाची आणि आनंदाची जी झोप घेत आहोत ती केवळ आपल्या देशाच्या सैनिकांमुळेच, सैनिक सीमेरेवर असताना त्यांना सहा सहा महिने ,वर्षभर सुट्ट्या मिळत नाही म्हणून आज माऊली वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुभाष वाघुंडे यांनी सैनिकांच्या सत्काराची जी संकल्पना मांडली आणि आज माजी सैनिकांचा सत्कार आयोजित केला ही गोष्ट कौतुकास्पद आहे.
डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले की, आज मितिला या आश्रमाच्या माध्यमातून अनेक वृद्धांची सेवा होत आहे पैकी मुला बाळांना व घरच्यांना समुपदेशन करून अनेक वृद्ध आपापल्या घरी त्यांची घर वापसी झाली आहे हे खूप मोठं काम या वृद्धाश्रमाने केले आहे, त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार म्हणाले की, माऊली वृद्धाश्रमाने आमच्या त्रिदल च्या माजी सैनिकांना व तालुक्यातील माजी सैनिकांना यथोचित सत्काराने सन्मानित केले त्याबद्दल सर्व माजी सैनिक आपले ऋणी आहेत, जर मुला मुलींनी आपल्या आई-वडिलांची चांगल्या प्रकारे सेवा केली तर देशात कुठेही वृद्धाश्रमाची गरज पडणार नाही, सर्वच मुला मुलींनी आपली ओळखच आपल्या आई वडिलांपासून आहे म्हणून आपण त्यांची सेवा मनापासून केली पाहिजे कारण चांगले काम किंवा वाईट काम जरी केले तरी अगोदर आई-वडिलांच्याच नावाचा उद्धार केला जातो हे आपण विसरता कामा नये , प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर शुभम महाराज कांडेकर म्हणाले की, आपण आपल्या आयुष्यात तीन लोकांच्या सेवा केल्या पाहिजे जन्मदाते आई वडील, शेतकरी, आणि सैनिक यांची जो सेवा करतो यापेक्षा कोणतेही मोठे कार्य नाही कारण आपण या तीन लोकांमुळेच या धर्तीवर आनंदाने व सुखासमाधानाने जगत आहोत, समाजामध्ये अनेक दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत आपण त्यांच्यापासून दुर राहिले पाहिजे जे आई- वडिलांचा सांभाळ करत नाहीत त्यांच्यामुळे वृद्धा अवस्थेत त्यांना वृद्धाश्रमात राहावे लागते ही बाब समाजासाठी अतिशय लांछनास्पद आहे, त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून ५०००१ /- रू ,ची रक्कम मेजर सुनील गवळी, बाळासाहेब भागडे यांच्या कडून गव्हाचे एक पोते, पार्वताबाई देसाई यांच्या कडून ११००/- रू, भगवान गुंजाळ यांचेकडून ५०० /- रु. बाळासाहेब लोखंडे यांच्याकडून ५००/- रु. वृद्धाश्रमास देणगी स्वरूपात देण्यात आले. याप्रसंगी त्रिदल सैनिक सेवा संघाचे मेजर कृष्णा सरदार,संग्रामजीत यादव, भगीरथ पवार, सुनील गवळी, रवींद्र कुलकर्णी, सोमनाथ टाके मंगेश यादव, बाळासाहेब भागडे, अमित देशमुख, पार्वताबाई देसाई, वसंतराव देसाई,ज्ञानदेव धाकतोडे,बाळासाहेब लोखंडे, भगवान गुंजाळ आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे तालुक्यातील आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुभाष वाघुंडे यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले.
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

