shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यामधील सहा ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी सरासरी 78.78 टक्के झाले मतदान. तर आज ठरणार गावचा सरपंच व सदस्य कोण ?

इंदापूर तालुक्यामधील सहा ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी  सरासरी 78.78 टक्के झाले मतदान. तर आज ठरणार गावचा सरपंच व सदस्य कोण ?
इंदापूर प्रतिनिधि: इंदापूर तालुक्यामधील सहा ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी रविवार (ता.05) रोजी सरासरी 78.78 टक्के मतदान झाले.यामध्ये राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावात 75.59 तर मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या शेळगाव मध्ये 82.45 टक्के मतदान झाले.किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पर पडली. मतमोजणी आज सोमवार रोजी इंदापूर येथे होणार आहे.
        ग्रामपंचायतसाठी झालेल्या मतदाना मध्ये बावडा येथील 10 हजार 270 मतदरांपैकी  7 हजार 763 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानाची टक्केवारी 75.59 होती.शेळगाव ग्रामपंचायतीसाठी 7 हजार 172 मतदारांपैकी 5 हजार 913 मतदारांनी मतदान केले.टक्केवारी 82.45 होती.
      काझड येथील 2 हजार 669 मतदरांपैकी  2 हजार 285 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानाची टक्केवारी 85.61 होती.वकीलवस्ती ग्रामपंचायतीसाठी 1 हजार 841 मतदारांपैकी 1 हजार 348मतदारांनी मतदान केले.टक्केवारी 73.22 होती.
शिंदेवाडी येथील 1 हजार 467 मतदरांपैकी 1 हजार 307 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानाची टक्केवारी 89.09 होती. लाकडी ग्रामपंचायतीसाठी 2 हजार 135 मतदारांपैकी 1 हजार 515 मतदारांनी मतदान केले.टक्केवारी 70.96 होती.यामध्ये इंदापूर तालुक्यातील एकूण 25 हजार 554 मतदारांपैकी 20 हजार 131 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर पोटनिवडणूक असलेल्या कचरवाडी येथे 71.99, कौठळी 88.87 व  चांडगाव येथे 92.49 टक्के मतदान झाले. अशी माहिती तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी दिली.
-
close