येत्या १५ दिवसांत पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्यास मा. जिल्हाधिकारी यांचे कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार - हानिफभाई पठाण
*श्रीरामपूर /प्रतिनिधी
श्रीरामपूर शहर व तालुका हद्दीत असलेल्या भंगार व्यवसायिकांची कसून चौकशी करून दोषीशींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्यासाठी अ.भा. भारतीय लहुजी सेनेच्या वतीने दिनांक ३०/१०/२०२३ रोजी पासून श्रीरामपूर येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केलेली होती.
परंतु कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ग्रामपंचायत निवडणूक व राज्यात सुरू असलेले मराठा आरक्षणाची आंदोलनेचा प्रश्न लक्षात घेता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सायंकाळी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण यांची उपोषणाच्या ठिकाणी मंडपात भेट घेतली व त्यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती पत्र दिले तसेच शहरातील संबंधित अवैध भंगारवाल्यांचे विरोधात १५ दिवसात कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले.या अनुषंगाने भारतीय लहुजी सेनेचे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी सांगितले.
मात्र पंधरा दिवसात पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्यास पुढील उपोषण मा.जिल्हाधिकारी सो. अहमदनगर यांचे कार्यालयसमोर दिनांक २१/११/२०२३ रोजीपासून पुन्हा सुरू करण्यात येईल असे राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण यावेळी म्हणाले.
यावेळी अध्यक्ष बाळासाहेब बागुल,सचिव हनिफ पठाण, संजय शेलार,डहाळे, अल्ताफ पोपटिया,शाहरुख शेख,नागेश साठे, ताराचंद खंडागळे, आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीरामपूर शहर व तालुक्यातील काही भंगार व्यवसायिकांकडून राजरोसपणे चोरीच्या दुचाकी, तीन चाकी,चार चाकी अशी वाहने तोडली जातात या वाहनांची कुठल्याही प्रकारची पोलीस प्रशासन व आरटीओ कार्यालयांची कुठली परवानगीचे अधिकृत पत्र न घेता अवैध मार्गाने सदरील चोरीच्या वाहनांची परस्पर विल्हेवाट लावलेली जात आहे. तसेच या व्यवसायातून काही भंगारवाल्यांनी मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये अल्पावधीत कमवलेले आहे. त्यांच्याकडे अचानक शेती, प्लॉट, मोठे बंगले हे कोठून आले ? याची सखोल चौकशीच्या मागणीसाठी व सदरील भंगार व्यवसायिकांनी आतापर्यंत किती वाहने तोडली ?,ही वाहने कोणाची होती, यांच्याकडे त्याचे स्क्रॅप लेटर आहे काय ? व सध्या काही भंगार दुकानदारांच्या दुकानासमोर दहा ते पंधरा वीस वाहने उभी आहेत, त्यास स्क्रॅप करण्याची त्यांनी आरटीओकडून अधिकृत परवानगी घेतली आहे का ?
ही सर्व वाहने चोरीची आहेत का? याची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच शहर व तालुका हद्दीत पोलिसांनी या भंगार दुकान व गोडाऊनवर एकाच वेळी छापा टाकलयास अनेक वाहनांचे इंजिन,संशयास्पद दुचाकी, चार चाकी, पार्टस इंजिन,चेसीज, सारख्या वस्तू आढळून येतील त्या अनुषंगाने त्याची तपासणी व्हावी व चोरीचे साहित्य वस्तू खरेदी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच श्रीरामपूर शहर व तालुक्यात, जिल्ह्यात जिल्ह्याबाहेर झालेल्या दुचाकी चोऱ्या, पाणी मोटारी, शेती अवजारे, वीज पंप, केबल, बॅटरी, चारचाकी वाहनांच्या चोरीच्या अनेक तक्रारी वाढलेल्या आहेत परंतु पोलीस प्रशासनाकडून याची कोणतीही गांभीर्याने दखल घेतली जात नाही हे एकाप्रकारे चोरांना अभय दिले जात आहे का ? वाहने स्क्रॅप करणाऱ्या काही भंगार दुकानदारांना देखील अभय दिले जात आहे का ? , चोरलेले सर्व साहित्य भंगार दुकानांमध्ये अल्प किमतीमध्ये विकले जात आहे. तसेच भंगार दुकान व्यवसायिकांनी भंगार म्हणून घेण्यात आलेल्या वस्तू व विकत घेताना विक्री करताना खात्री करत नाहीत,वस्तू कोणाच्या मालकीच्या आहेत याची खात्री करणे गरजेचे असते, मात्र भंगार व्यवसायिक नियमाचे पालन करताना दिसत नाहीत. भंगार माल मालकीचा असेल तर नोंद करून कागदपत्रे जमा ठेवावी परंतु तसे होताना दिसत नाही, श्रीरामपूर शहर पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेक वेळा तक्रार निवेदन देऊनही पोलीस प्रशासन आणि आरटीओ कोणतीही दाखल घेत नाही, म्हणून भंगार व्यवसायिकांना कसलीही भीती उरलेली नाही असा आरोप भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व राष्ट्रीय सचिव हनिफ भाई पठाण यांनी केली आहे.
तक्रार निवेदनाची कोणत्याही दखल न घेतल्याने भारतीय लहुजी सेनेचेच्या मागणीनुसार पोलिसांनी शहर व तालुक्यातील सर्व भंगार दुकानाची अनेक पथके नेमून अचानक तपासणी करावी व दोषींवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावी या मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेने अनेक वेळा पोलीस प्रशासन व आरटीओला निवेदन दिले होते पण त्याच्यावर कोणतीही सखोल दंडात्मक कारवाई झालीलेली नाही
त्यामुळे भारतीय लहुजी सेनेने आक्रमक पवित्रा घेत. श्रीरामपूर येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर भंगार व्यवसायिका विरोधात सखोल व दंडात्मक कारवाई आणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठीच्या मागणीसाठी व पोलीस प्रशासनाने ताबडतोब कारवाईच्या मागणीसाठी अमरण उपोषणास सुरुवात केलेली होती.
या वेळी, सरवरली मास्टर, सलमान पठाण,युसूफ शेख,साळवे विश्वनाथ संजय वाव्हळ, सिकंदरभाई तांबोळी, नानासाहेब शिंदे, नंदकुमार बगाडे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

