shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फौंडाघाट कणकवलीच्या रिक्षा चालकांची अनोखी समाजसेवा


*सरळगांव शालेय विद्यार्थ्यांना फॅन,कोलगेट,साबण वाटप करत जपली सामाजिक बांधिलकी*

*सौरभ कामडी - पालघर
कणकवली तालुक्यातील फौंडाघाट स्टॅण्ड येथील रिक्षा चालकांनी अनोखी सामाजिक बांधिलकी जपत मुरबाड तालुक्यातील सरळगांव विभाग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दोन सिलिंग फॅन व वसतिगृहातील ३० गरजू विद्यार्थ्यांसाठी साबण आणि कोलगेटचे वाटप करत जपली अनोखी समाजसेवा.

वरील साहित्य मिळवून व फॅन देण्यासाठी रिक्षाचालक राजेंद्र कदम गडमाठ सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला असून कदम हे नेहमीच सदर वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व इतर साहित्याचे वाटप करत असतात यावेळी सर्वच रिक्षाचालकांची मनाची श्रीमंती दिसून आली सदर साहित्यासाठी खालील रिक्षाचालकांनी आर्थिक योगदान दिले राजेंद्र कदम ,रुपेश मेजारी , सचिन परब , सतीश कसले, लक्ष्मण बुवा ,संतोष तेली , शिवा सावंत ,विजय राणे ,हेमंत कोदे ,संजय खाडये ,प्रवीण कदम,रवींद्र कदम,संतोष चव्हाण , दिगंबर राणे ,गणेश गोसावी ,विनोद विस्वेकर ,संतोष बिडये,दिनेश मेजारी ,अजय कोर्लेकर ,बाबू हुले विकास वरूनकर ,शिवा सावंत, प्रशांत भोगटे तसेच यावेळी विद्यालयाचे प्राचार्य जी.ओ माळी सर व पर्यवेक्षक डी. एम.पंडित सर यांनी फॅन रिक्षा चालकांच्या वतीने दुपार सत्र प्रमुख संजय इधे सर यांचे कडून स्वीकारले तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना यावेळी साबण कोलगेट यांचे वाटप करण्यात आले यावेळी प्राचार्य माळी सर यांनी सदर रिक्षाचालकांचे आभार मानून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी सहशिक्षक जे.एल. बोरसे सर, सौ शशिकला इधे मॅडम, अभिलाषा दळवी मॅडम, वसतिगृह चौकीदार जालिंदर अभिवंत, संजू बागुल तात्या हे उपस्थित होते.विदयालयातील सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवत  चालकांसाठी सामाजिक कार्याचे अभिनंदन केले.

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close