विशेष प्रतिनिधी
श्रीरामपूर - कोरोनाच्या भीषण संकटानंतर यावर्षी दिवाळी सणानिमित्त श्रीरामपूरची बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. शेवटच्या चार-पाच दिवसांमध्ये तर शहरांमध्ये सर्व मुख्य रस्त्यांवर लोकांची गर्दी दिसून आली.मेन रोडवर दोन्ही बाजूने वेगवेगळे वस्तू विक्रीचे स्टॉल लागल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करावा लागला आहे.व्यापाराबरोबरच या ठिकाणी जागेवरून छोट्या व्यापाऱ्यांमध्ये वादही झाले आणि हे प्रकरण थेट पोलीस स्टेशन पर्यंत देखील गेले.
गेले चार पाच दिवस दिवाळीच्या खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत होता.लहान मुलापासून आभार होतापर्यंत सर्वजण दिवाळीच्या खरेदीसाठी रस्त्यावर उतरले होते मेन रोडवर घरगुती वस्तू विक्रीचे अनेक स्टॉल लागले होते त्याचबरोबर कपड्याची दुकाने थाटली होती. मोठे दुकानदार देखील यावर्षी थोडे सुखावलेले दिसले. मागील दोन-तीन वर्षापेक्षा यावर्षी जरा चांगला व्यापार झाल्याचे अनेक व्यापाऱ्यांनी बोलून दाखवले.
ऑनलाइन खरेदीमुळे बाजारपेठेवर परिणाम झाला असल्याचे अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले.
तालुक्यातील एकमेव आर्थिक आधार असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याने दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना आपले उसाची पेमेंट केल्याने मोठी रक्कम बाजारपेठ उपलब्ध झाली.त्यामुळे देखील व्यापाऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता.
दसऱ्यानंतर यावर्षी दिवाळीमध्ये फुलांच्या बाजारात तेजी असल्याने शहरातील फुल विक्रेत्यांचा व्यवसाय सुद्धा तेजीत होता.दसऱ्याला झेंडूची फुले मातीमोल भावात विकली गेल्यामुळे फुलांची विक्री कमी झाली होती. मात्र यावेळी फुलांना जास्त भाव असल्याने फुल विक्रेत्यांच्या दुकानात सुद्धा हार विक्रीचा व्यवसाय तेजीत होता असे बाबा फुल भंडारचे संचालक राहुल गिरमे यांनी सांगितले.
शहरामध्ये दिवाळीनिमित्ताने फटाका विक्रीची मोठी उलाढाल झाली.किमान पाच कोटी रुपयांची फटाका विक्री झाल्याचा अंदाज फटाका व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात लागलेली फुल विक्री,फटाका विक्री व इतर स्टॉल्स यातून मोठ्या प्रमाणात शहरात कचरा देखील गोळा झाला. गेले चार दिवस नगरपालिकेचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास पंचवीस टन कचरा उचलून नेल्याचे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. यंदाची दिवाळी आनंदात साजरी झाल्याने शहरातील सर्व व्यापारी वर्ग तसेच नोकरदार वर्ग यांनी समाधान व्यक्त करून परमेश्वराचे आभार मानले.
पाडवा उद्या भाऊबीज नंतर अजून आठवडाभर सुद्धा बाजारपेठेमध्ये गर्दी राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली.
चौकट
*अनुराधा आदिक यांची खरेदी*
लोकांनी ऑनलाईन खरेदी न करता आपल्या शहरातील व्यापाऱ्यांकडून आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी कराव्यात असे आवाहन करीत माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांनी स्वतः आपली दिवाळीची खरेदी शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडे केली आणि एक प्रत्यक्ष कृतीचे उदाहरण त्यांनी घालून दिले.त्यांच्या या कृतीचे शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
*दमदार नेतृत्वाची गरज*
श्रीरामपूर शहर व तालुक्याचे गेलेले वैभव परत मिळविण्यासाठी तसेच श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी श्रीरामपूर तालुक्याला तरुण तडफदार दमदार आणि भक्कम नेतृत्वाची गरज आहे.तालुक्यातील विद्यमान राजकीय पुढाऱ्यांकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये एखादे नवीन नेतृत्व शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी उदयास आले पाहिजे अशा भावना सामान्य जनतेमध्ये व्यक्त होत आहेत.
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*

