shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील गैरकारभाराबाबत नामदार तनपुरे यांचा जनता दरबार..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२३

राहुरी  :  महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या कडून प्रशासकीय कार्यलयासमोर जनता दरबार  दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता  आयोजित केला जाणार आहे. या जनता दरबारात विद्यापीठामध्ये कामकाजासाठी येणाऱ्यांची होणारी अडवणूक, ठेकेदारांचे बिल अडवून ठेवणे, जाणूनबुजून कामे प्रलंबित ठेवणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा त्रास तसेच कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरून काढून टाकणे, विद्यापीठ हद्दीत सुरक्षा रक्षकांकडून होणारी अडवणूक आदी प्रकार बाबत जाब विचारला जाणार आहे. 

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील गैरकारभाराबाबत नामदार तनपुरे यांचा जनता दरबार..!!
     महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या सर्व समस्यांबाबत प्रशासकीय कार्यालय प्रवेशद्वार समोर  दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता होणार आहे.  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील प्रशासकीय कार्यलयासमोर जनता दरबार आयोजित  दरबारास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन मा. नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close