७० वर्षानंतर पुन्हा वाजणार
या मुलांची शाळेची घंटा
श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील रयत शिक्षण संस्थेचे डी.डी.काचोळे विद्यालय (जनता हायस्कूलच्या) माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मेळावा संयोजन समितीचे अध्यक्ष किशोर गदिया यांनी दिली आहे.
१९५३ साली सुरू झालेले जनता हायस्कूल शहरातील सर्वात जुने विद्यालय आहे. विद्यालय नजीकच्या काळात अमृत महोत्वाकडे वाटचाल करत आहेत. स्थापनेपासून ते २०१५ सालापर्यंतचे विविध क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित राहणार आहेत. सर्व बॅचचे विद्यार्थी येणार असल्याने एकाच बेंचवर बसलेल्या मित्रांना सर्व शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. तसेच मेळाव्यासाठी आज पर्यंतचे सेवा केलेले सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांची पुन्हा एकदा भेट घडून येणार आहे.
महामेळावा नियोजनबध्द करणेसाठी माजी विद्यार्थी संघ संयोजन समितीची स्थापना करण्यात आली असून विविध समितीची रचना करणेत आली आहे.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी लवकर रजिस्ट्रेशन करावे त्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आली असून स्थानिक विद्यार्थ्यांसाठी विद्यालयात रजिस्ट्रेशन सुरू आहे.
मेळाव्यामध्ये परिपाठ, अध्ययन- अध्यापन,विद्यार्थी परिचय,ग्रुप चर्चा, स्नेहभोंजन,मान्यवरांचे सत्कार,खेळ आदीसह मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जाणार आहे.
महामेळाव्याचे उद्घाटन मीनाताई जगधने मॅनेजिंग कौन्सिल सदस्या,यांचे शुभहस्ते तर जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
बऱ्याच वर्षानंतर (माजी विद्यार्थ्यांचा दि.१८ नोव्हेंबर २०२३ रोजी भरणाऱ्या)
आपल्या शाळेत ११ ते ५ या वेळेत शाळेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी हजर रहावे असे आवाहन माजी विद्यार्थी महामेळावा संयोजन समितीचे अध्यक्ष किशोर गदिया, कार्याध्यक्ष ऍड.समीन बागवान उपाध्यक्ष वकील संघ श्रीरामपूर, उपाध्यक्ष योगेश वाकचौरे,सचिव पोपटराव शेळके,सल्लागार गणेश थोरात,मार्गदर्शक सुनील बोलके, भाऊसाहेब मुळे,निलेश भालेराव,बाबासाहेब खोसरे, अविनाश पटारे, अल्पेश झुरंगे, कासिम सय्यद,सोमनाथ वाडेकर, मेजर कृष्णा सरदार, सय्यद असिफ, प्रशांत दांगट,भारत बोर्डे, मच्छिंद्र पवार आदींनी आवाहन केले आहे.
मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी माजी विद्यार्थी संघ संयोजन समिती व डी डी काचोळे माध्यमिक विद्यालय स्टाफ परिश्रम घेत आहे.
*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:* समता न्यूज नेटवर्क श्रीरामपूर *9561174111*

