shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिवाळी अंकाची वाचकांना मेजवानी - लेखक गिताराम नरवडे


अहमदनगर प्रतिनिधी:
 दिवाळी अंकामध्ये सर्व विषयांचा समावेश असून अनेक लेखकांचा त्यामध्ये सहभाग असतो. ही साहित्यकृती एक परिपूर्ण साहित्य कृती असुन ही रसिक वाचकांसाठी मेजवानी असते. याचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लेखक गीताराम नरवडे यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे दीपावली विशेष अंक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात श्री. नरवडे बोलत होते.यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर उपस्थित होते.

प्रदर्शनाविषयी माहिती देताना जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर म्हणाले, विविध विषयांवरील दीपावली विशेषांकाचा या प्रदर्शनामध्ये सहभाग आहे. हे प्रदर्शन ३० नोव्हेंबर पर्यंत शासकीय सुट्ट्या बघून सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. या प्रदर्शनात विविध विषयावरील नामांकित प्रकाशकांचे आणि नवोदित प्रकाशकांचे दोनशेच्या वर दिवाळी अंक मांडण्यात आले आहेत. यामध्ये साहित्य विषयक, विनोदी,महिलांसाठी, ज्योतिष विषयक, आरोग्य विषयक, क्रीडाविषयक रहस्यकथा, अध्यात्मिक मुलांसाठी, स्पर्धा परीक्षा ,पाककृती, चित्रपट, पर्यटन, शैक्षणिक ,कथा असे वाचनीय दिवाळी अंक उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले.  

प्रास्ताविक तांत्रिक सहाय्यक हनुमान ढाकणे यांनी केले तर आभार प्रदर्शन शैलेश घेगडमल यांनी केले.
यावेळी  अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल अमोल इथापे,संतोष वाडेकर, कुमार कुंटला,रामकृष्ण सोनाळे, ओंकार फुलकर संकेत मेहुल आदींसह बहुसंख्य रसिक वाचक उपस्थित होते.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close