shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर तहसील कार्यालय कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराने नागरिक प्रचंड हैराण... अधिकारी करतात तरी काय ? हा जनसामान्यांना पडलेला प्रश्न..


*वरिष्ठ अधिकारी आणि आमदार महोदयांनी वेळीच लक्ष घालण्याची नागरीकांची मागणी

श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तहसील कार्यालयात श्रावणबाळ,व संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे वेळेवर होत नसल्याने अनेक नागरिकांच्या तक्रारी वारंवार उपस्थित होत आहेत, याकडे तहसीलदार श्रीरामपूर यांनी लक्ष घालून संबंधिताना योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी ज्येष्ठ नागरिक बी.आर.चेडे यांनी केली आहे.

मंगळवारी माझ्या (सौ.सुमन बाबासाहेब चेडे ) पत्नीचे श्रावण बाळ प्रकरण सादर केले, त्याची चौकशी करण्यासाठी त्या कार्यालयात मुलीला पाठविले असता तेथे पात्र,अपात्र अशी यादी लागलेली होती.त्यावेळी असे निदर्शनास आले की वय ६४-६५ असताना यादी क्रमांक २९ वर सुमन बाबासाहेब चेडे वय ४८ हे अपात्र दाखविण्यात आले आहे.मुलीने संबंधिताना दाखविले व विचारले असता त्यांनी बरोबर असल्याचे सांगितले.वास्तविक आधार कार्ड व मतदान कार्ड दाखविल्यावर ऑनलाईन त्याचवेळी तपासायला पाहिजे असते.मुलीने त्यांना सांगितले की माझे वय ४५ असताना आईचे वय ४८ कसे? याचा अर्थ सर्व कागदपत्रे व्यवस्थित पहिल्या जात नाहीत म्हणून मन:स्ताप होतो.मुलीने थेट तहसीलदार यांची भेट घेऊन कागदपत्रे दाखविली.व संबंधित अधिकारी यांना तशा सूचना देऊन झालेली चूक सांगितली व महिना दोन महिने थोडे थांबावे लागेल असे सुचविले.परंतु दुसरे प्रकरण सादर न करता हेच प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी ग्राह्य धरावे.पण एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे यादीत १७ वर्षाचा फरक पडला. अशा किती लोकांच्या चुका होत असतील व वयोवृद्धांना किती हेलपाटे मारावे लागत असतील हा प्रश्न पडतो.गर्दीमुळे कर्मचारी उत्तरे देत नाही.आता होणार नाही.बरीच गर्दी आहे असे सांगीतले जाते.याबाबत तालुक्याचे आमदार लहूजी कानडे साहेब यांचेकडे तक्रार केली आहे.त्यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे.

ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव


*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close