shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरीतील कावडीवाल्यांवर श्रीरामपुरात जिहादींकडुन हल्ला;गुन्हा दाखल..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३

राहुरीतील कावडीवाल्यांवर श्रीरामपुरात जिहादींकडुन हल्ला;गुन्हा दाखल..!!

श्रीरामपूर : राहुरी तालुक्यातील कनगर येथील कनकावती माता यात्रेनिमित्त पुणतांबा येथुन गंगेचे पाणी आणण्यासाठी आलेल्या कावडी वाल्यांना श्रीरामपूर शहरातील सिंधी मंदिराच्या गेटसमोर काही जिहादी प्रवृत्तीच्या आरोपींकडून काल शनिवारी रात्री मारहाण करण्यात आली. काहीही कारण नसतांना कावडवाल्यांची टाटा झिप ही गाडी अडवुन हल्ला करुन,त्यांना लोखंडी रॅाड व दगडाने मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
      या प्रकरणी श्री.अनिकेत राजेंद्र घाडगे,राहणार-कनगर,तालुका राहुरी यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या जिहादी प्रवृत्तींविरोधात आज दि.२६ /११/२०२३ रोजी ०१:५२ वा गुन्हा रजिस्टर नं.१२३५/२०२३ कलम ३२४,१४३ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये कुरेशी व शेख नामक आरोपी असल्याचे समजत आहे.

       सदर गुन्हा दाखल होण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात काल रात्री ८ वाजल्यापासून अडीच वाजेपर्यंत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.यासाठी अनेक हिंदुत्वादी संघटना व पक्षांसह शिवप्रहारने भूमिका बजावली.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close