श्रीरामपूर (प्रतिनिधी):- श्रीरामपूर येथून नियमित प्रकाशीत होणारे साप्ता. शीतल टाईम्स या वृत्तपत्राच्या दिवाळी अंक २०२३ नुकताचे प्रकाशन राष्ट्रपतीपदक विजेते तथा साईबर गुन्हे शाखेचे नाशिक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले की, हा दिवाळी अंक अतिशय सुबक व चांगल्याप्रकारची मांडणी करून लोकांसमोर संपादक नरेंद्र लचके यांनी एक प्रकारची दिवाळीची मेजवाणीच दिली आहे. मी या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी संपादक नरेंद्र लचके यांना सांगू इच्छितो की, आपल्या सर्व दिवाळी अंकातील लेख, व्यंगचित्र, कविता, चारोळ्या, कथा ह्या सर्व वाचनीय आहेत. त्याची योग्य प्रकारची मांडणीही केलेली आहे. परंतु चालु काळात साईबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या विषयावर जनजागृती होणे आवश्यक आहे. पुढील दिवाळी अंकात तसेच आपल्या वृत्तपत्रात नियमित साईबर गुन्ह्यासंबंधी बातम्या, लेख प्रसिध्द करून सर्वसामान्य जनतेची जनजागृती करून साईबर गुन्ह्याला कशा जास्तीत जास्त आळा बसेल हे प्रसिध्द कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. सदर अंकात प्रसिध्द केलेल्या लेखकांचे, कविंचे, व्यगचित्रकारांचे डॉ.कोल्हे यांनी दिपावली पाडवा व नूतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन कौतुक केले. ह्या वर्षीपेक्षाही पुढच्या वर्षीं दिवळी अंक अतिशय चांगल्या प्रकारे काढण्यात यावा अशी सदिच्छा व्यक्त करून संपादक नरेंद्र लचके यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी नरेंद्र लचके यांनी सांगितले की, डॉ. कोल्हे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाचा विचार करून आमच्या वृत्तपत्रात चालू घडामोडी विषयी तसेच आज सर्वसामान्य जनतेची साईबर गुन्हे करणारे कशा पध्दतीने फसवितात तसेच गोड बोलून अथवा लालूच देऊन गोर-गरिबांची कशा प्रकारे फसवणूक करतात याविषयी नक्कीच प्रिंटमिटीयाच्या माध्यमातून आम्ही आमच्या वाचकांसमोर तसेच सर्वसामन्य जनतेसमोर देऊ यात शंक नाही. आज आमच्या राष्ट्रपतीपदक विजेते तथा साईबर गुन्हे नाशिक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.सिताराम कोल्हे यांनी आमच्या दिवळी अंकाचे प्रकाशन करून व त्याप्रसंगी मागदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देतो. याप्रसंगी शीतल टाइम्स् नाशिक विभागीय कार्यालयाचे निवासी संपादक समीर वेलदे यांनी प्रस्ताविक केले तर संतोष आंबाडकर यांनी सर्वांचे आभार मानले.

