shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आता आपणच बदलू या... लेख पहिला

       दिवाळीच्या तोंडावर प्रत्येकाने काही मूलभूत तत्वे लक्षात घ्यायला हवीत. संपत्ती, कल्याण, आनंद या सर्वांचा त्रिकोण म्हणजेच उत्तम आरोग्य. उत्तम आरोग्य, शरीर संपदा हेच सर्वश्रेष्ठ धन होय अशा अर्थाने हेल्थ इज वेल्थ असे म्हटलेले आहे. 
आपल्याला एखाद्या विषयात उत्तम यश मिळवायचं असेल तर त्यासाठी पराकोटीची जिद्द, परिश्रम आणि निजध्यास, सातत्य, त्याग या गोष्टींचा पाठपुरावा करावाच लागतो. तेव्हाच निखळ यश मिळते, उत्तम मार्क मिळतात, निरोगी आरोग्य मिळते. त्याला आपण गोल्ड मेडल मिळाले असे म्हणतो. 

यासाठी प्रथमतः आपल्याला आरोग्यास घातक ठरणाऱ्या सवयींपासून दूर राहण्याचा निश्चय करायला हवा. प्रत्येकाला आपली क्षमता माहिती असते. तेव्हा क्षमतेनुसार जबाबदारी स्वीकारणे ही उत्तम आरोग्याची पहिली पायरी होय. 

अंगावर घेतलेली कामे शरीर स्वास्थ्य बिघडवून पूर्ण करताना आर्थिक भूक भागविली जाते मात्र शरीराची जी हेळसांड होते ते नुकसान कधीही भरून न येणारे असते. मग आपण कमावले काय? भ्रामक चंगळवादी पैशाच्या मागे लागून शरीर स्वास्थ्य बिघडविले. हेल्थ इज वेल्थ हे सत्य आहे मग आपण बरेच काही गमावत आहोत याचा 
 विचार करा. या दिवाळीपासून अंतर्मुख बनायला शिका.

देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने, पुणे
९८८१३७३५८५
close