श्रीरामपूर प्रतिनिधी:
आजचे जग धावपळीचे आणि तणावग्रस्त झाले आहे, त्यामुळेच आपलं अंतर्मन सकारात्मक हवे. बाह्य तणावापासून स्वतःला सुरक्षित ठेवले पाहिजे, त्यामुळेच मनाची निर्मळता आणि तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी संमोहन ही काळाची गरज असल्याचे मत संमोहनतज्ज्ञ डॉ. रामकृष्ण सोन्याबापू जगताप (राज)यांनी व्यक्त केले.
येथील तालुका विधी समिती, श्रीरामपूरतर्फे कायदेविषयक जनजागृती शिबिरात डॉ. रामकृष्ण जगताप यांचे 'संमोहन आणि व्यक्तिमत्व विकास 'या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायधीश ०१ व अतिरिक्त सत्र न्यायधीश, श्रीरामपूरचे अध्यक्ष अभिजित अ. नांदगावकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. श्री.व्ही.एम. साळुंके यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय ॲड.श्री. समीन बागवान यांनी करून दिला.न्यायधीश नांदगावकर यांनी डॉ. जगताप यांचा सत्कार गुलाबाचे रोप देऊन केला. डॉ.रामकृष्ण जगताप (राज) यांनी आजाराचे मूळ कारण मन असून मनाची योग्यप्रकारे मशागत करून मानसिक आजार घालवता येतात तसेच मानसिक आजारातूनच शरीरात आजार तयार होतात असे सांगून आहार,विचार,व्यायाम यात सुसूत्रता ठेवल्यास आजार जडत नाहीत सकारात्मक विचार व सकाळी फिरणे अशा चांगल्या सवयींची उपयुक्तता विषद करून डॉ.रामकृष्ण जगताप(राज) यांनी संमोहन शास्त्र प्रयोगाचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.सुचनारुपी आज्ञावलीचा शरीरावर होणारा परिणाम कसा होतो याची प्रचिती यावेळी सर्वांना आली. व्यक्तिमत्त्व विकासासाठी संमोहन कसे काम करते याची सखोल माहिती देऊन आपले जीवन आपणच घडवितो अन् आपणच बिघडवितो त्याची मानसशास्रीय माहिती दिली यावेळी सूचना देऊन डॉ.रामकृष्ण जगताप (राज) यांनी सर्वांना स्वसंमोहन शिकविले तसेच उपस्थित ॲड. तांबे यांचे शरीर सूचना देऊन कडक केले व त्यावर ॲड. कारखानीस यांना उभे करून अंतर्मनाची प्रचीती करून दिली.डॉ. जगताप यांनी संमोहनाची आणि मनाची माहिती विविध उदाहरणातून स्पष्ट केली. सूत्रसंचालन सौ.एस पी.गर्जे यांनी केले तर ॲड.श्री.समीन बागवान यांनी आभार मानले.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

