वाहनांच्या तपासणीसाठी मोटार वाहन निरीक्षकांचा दौरा निश्चित
अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
वाहनांच्या तपासणीसाठी मोटार वाहन निरीक्षक यांचा दौरा निश्चित करण्यात आला असुन तो खालीलप्रमाणे राहील.
दि. २ नोव्हेंबर,२०२३ रोजी जामखेड, ३ नोव्हेंबर श्रीगोंदा, ६ नोव्हेंबर पारनेर, ७ नोव्हेंबर कर्जत, ८ नोव्हेंबर शेवगाव, ९ नोव्हेंबर पाथर्डी, १६ नोव्हेंबर टाकळी ढोकेश्वर व १७ नोव्हेंबर, २०२३ रोजी काष्टी या ठिकाणी दौरा निश्चित करण्यात आला आहे.
ज्या दिनांकास सार्वजनिक सुट्टी असेल किंवा शासकीय सुट्टी जाहीर होईल तसेच प्रशासकीय कारणास्तव दौरा रद्द झाल्यास त्या दिवसाच्या मासिक दौऱ्याचे कामकाज दुसऱ्या सोईस्कर दिवशी होईल व त्याची तारीख त्यावेळी जाहीर करण्यात येईल.अर्जदारांची अपूर्ण कागदपत्रे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वीकारली जाणार नाहीत. कँपच्या सर्व कामकाजाबाबत शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक राहील. दौऱ्याच्या ठिकाणी परराज्यातुन आलेली वाहने (आरएमए) तसेच बसेसची तपासणी केली जाणार नाही. ज्या तालुक्यात कँप आयोजित करण्यात आलेला आहे त्या तालुक्यातील नागरिकांचे कँपमध्ये कामकाज करण्यात येईल. शिबीराच्या ठिकाणी तपासणी होणाऱ्या सर्व नवीन तात्पुरती नोंदणी झालेल्या परिवहतेत्तर संवर्गातील वाहनांचे डिस्क्लेमर असल्याशिवाय वाहनांची तपासणी करण्यात येणार नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

