इंदापूर येथे भारतीय संविधान दिन व गौरव राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त ११७ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथे लोकसेवा युथ फाउंडेशनच्या वतीने भारतीय संविधान दिन व गौरव प्रकाश राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ११७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याचे रक्त संकलित करुन इंदापूर येथील मुक्ताई ब्लड बँक यांना देण्यात आले.
या प्रसंगी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कर्मयोगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरतशेठ शहा, कैलास कदम, पांडुरंग शिंदे, प्रा. कृष्णा ताटे, पोपट शिंदे, बाळासाहेब ढवळे,शेखर पाटील शकील सय्यद,रमेश शिंदे,अनिल राऊत, अजिंक्य जावीर, अमोल राऊत इत्यादी उपस्थित होते.
तसेच हा उपक्रम पार पाडण्यासाठी लोकसेवा युथ फाउंडेशन च्या सर्व सदस्यांनी कठीण परिश्रम घेतले.

