*श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी आण्णासाहेब डावखर
*डावखर यांच्या निवडीने निष्ठावंतास न्याय - ससाणे
श्रीरामपूर प्रतिनिधी:
मा.आ.स्व.जयंतराव ससाणे यांचे विश्वासू सहकारी व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आण्णासाहेब डावखर यांची श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रताप देवरे व श्रीरामपूर काँग्रेसच्या ग्रामीण अध्यक्षपदी अरुण पाटील नाईक यांची निवड झाली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी माजी महसूल मंत्री. आ.बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करावे.तसेच काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवावे व काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एकदिलाने काम करावे. विकासात्मक कामे करण्यासाठी व सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करावे असे जिल्हा बँकेचे संचालक, मा उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी म्हटले आहे. श्रीरामपूर तालुका काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ससाणे बोलत होते.
याप्रसंगी काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर म्हणाले की, मा आ स्व जयंतराव ससाणे यांची प्रेरणा घेऊन श्रीरामपूर शहरातील काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे . यानंतर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्रताप देवरे यांनीही करण ससाणे यांना धन्यवाद देत आपली निवड सार्थ करून दाखवणार असल्याचे म्हटले. या सत्कार समारंभ प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय फंड, जि. प. चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, मा. नगरसेवक के सी शेळके, मुजफ्फर शेख,आशिष धनवटे, रमजान शहा, प्रदीप कुऱ्हाडे, प्रवीण नवले, अल्पसंख्यांक सेलचे सरवरअली मास्टर , सुरेश ठुबे, रितेश एडके, अशोक जगधने, युनुस पटेल, भगवान जाधव, मंगलसिंग साळुंके, रियाज खान पठाण, सनी मंडलिक, नजीर भाई शेख, सुनील साबळे, बाबा वायदंडे, फ्रान्सिस शेळके, रमजान पटेल, महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे सरचिटणीस अमोल शेटे, लक्ष्मण शिंदे, सरबजितसिंग चूग, बुऱ्हाणभाई शेख, संजय गोसावी,योगेश गायकवाड, वैभव कुऱ्हे, गोपाल भोसले, विशाल साळवे, कल्पेश पाटणी, आकाश जावळे,राजेश जोंधळे, प्रशांत आल्हाट, सागर दुपाटी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पत्रकार दिपक कदम,श्रीरामपूर
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर 9561174111

