*शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमता सुधारणा याबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाली.- आमदार दत्तात्रय भरणे*
शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा(इंदापूर प्रतिनिधी):राज्यात शेती महामंडळाचे पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक कोल्हापूर सातारा व औरंगाबाद या सात जिल्ह्यांमध्ये एकूण १४मळे आहेत. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात शेती महामंडळाचा रत्नपुरी मळा आहे खंडकरी शेतकरी यांना शेती महामंडळाकडून जमीन वाटप करताना भोगवटा वर्ग २ वाटप करण्यात आले होते तसेच या जमिनीचे वाटप झाल्यानंतर दहा वर्षानंतर वर्ग २ वरून भोगवटा वर्ग १ मध्ये शासन स्तरावर करण्यात येणार होते परंतु त्या जमिनीचा वर्ग १ झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज विहीर पाईपलाईन व अन्य शेतीशी निगडित कर्ज घेता येत नसल्याने त्यांना आर्थिक बाबींना सामोरे जावे लागत होते.याबाबत पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचना आमदार दत्तात्रय भरणे यांनी मांडली . व त्यानंतर सभागृहात चर्चेदरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत विधी व न्याय विभाग व वित्त विभाग यांचे अभिप्राय घेऊन या राज्यातील सर्वच शेती महामंडळ च्या शेतमालावरील जमिनीचा भोगवटा नंबर १ मध्ये रूपांतर करणे बाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले होते त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली..
त्यानुसार महसूल विभाग विधी व न्याय विभाग या विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता त्यानुसार आजच्या दिनांक २९ नोव्हेंबर 2023 रोजीच्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमता सुधारणा करणे यावर या प्रस्तावावर चर्चा झाली त्यानुसार भोगवटा वर्ग २ चे भोगवटा वर्ग १ मध्ये रूपांतर होणे बाबत महसूल विभागास निर्देश देण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडून सहकार्य लाभल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

