shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अडीच कोटीचे बील अदा करण्यासाठी चक्क एक कोटी रुपयांची लाच घेतो !अहमदनगर एमआयडीसीचा उपभियंता लाचलुचपत प्रतिबंधक च्या जाळ्यात येतो !!

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची अहमदनगरमध्ये मोठी कारवाई

एमआयडीसीचा अभियंता अमित गायकवाड सह तत्कालीन अभियंता गणेश वाघ या दुक्कलीची कोटींची लाचखोरी

अहमदनगर विशेष प्रतिनिधी: रमेश जेठे (सर)

शर्मिष्ठा वालावालकर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक पदाचा कार्यभार संभाळल्यानंतर सगळ्याच लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. त्यांची धडक कारवाई करण्याची पद्धत तसेच कुणाचीही तमा न बाळगता कर्तव्यात कसून न करण्याचा बाणा असल्याने त्यांचा दरारा तसा पूर्वीपासूनच आहे. आता त्यांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वासराव नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावालकर यांच्या पथकाने अहमदनगर एमआयडीसीचे उपअभियंता अमित गायकवाड आणि तत्कालीन विभागीय अभियंता गणेश वाघ यांना तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.

शर्मिष्ठा वालावलकर यांची धडाकेबाज कारवाई

 अहमदनगर मध्ये शुक्रवारी रात्री उशिरा नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकानं तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना सहाय्यक अभियंत्याला अटक केली आहे. या संदर्भात रात्री उशिरा अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यांच्यासह तत्कालीन सहाय्यक उपअभियंता गणेश वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्री उशिरा लाच घेताना उप
 अभियंता गायकवाडला अटक

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यास अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास जवळ रात्री उशिरा लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी अंतर्गत ठेकेदाराने १००० एम एम  व्यासाचे पाईप टाकण्याचं काम केले होतं. या कामाची रक्कम तब्बल २ कोटी रुपये बिल झाले होते. दरम्यान या बिलाची मागणी ठेकेदाराने केल्यानंतर मागचे बिल आउट वर्ड वर घेऊन तत्कालीन अभियंताचे स्वाक्षरी घेण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याने फिर्यादी ठेकेदार याच्याकडे एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान नाशिक प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास जवळ सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यास एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. 

या प्रकरणांमध्ये तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील ५०% वाटा होता, अशी कबुली अटकेत असलेल्या अमित गायकवाड यांनी दिली आहे.

*अडीच कोटींच्या बीलासाठी मागीतली चक्क १ कोटीची लाच

 छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदार यांनी अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत १००० एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचं काम केलं होतं. या कामाचे २ कोटी ६६ लाख ९९ हजार २४४ रूपयांचे बिल मिळावे म्हणून सदर बिलांवरती तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचं आउटवर्ड करुन त्याच्या सह्या घेतल्या. देयकं पाठवण्याच्या मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ यांच्याकरता या बिलाच्या कामाचं व यापूर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची लाच म्हणून एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती, तशी तक्रार शासकीय ठेकेदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अहमदनगरमध्ये अशी केली कारवाई

नाशिक लाच लुचपत पथकाने शुक्रवारी सायंकाळी अहमदनगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेंडी शिवारात सापळा लावला. त्यावेळी मागणी केलेली लाचेची एक कोटी रुपयांची रक्कम गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्याकरता तक्रारदार ठेकेदाराकडून एका इनोव्हा कारमध्ये पंच, साक्षीदारांसमक्ष स्वीकारली आहे. त्याचवेळी गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरुन वाघ याला फोन करून लाचेच्या रक्कमेबाबत माहिती दिली व त्याच्या हिश्याचे ५० टक्के कोठे पोहचवावे याबाबत विचारलं असता वाघ याने सांगितलं की, 'राहु दे तुझ्याकडे तुलाच पोहचवायचे आहे एका ठिकाणी, सध्या तुझ्या सेफ कस्टडीमध्ये ठेवून दे', असं म्हणून वाघ याने गायकवाड याला फोनवरून सांगत लाच मागणीस व स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close