Nov 29, 2023.
सुट्टीचा दिवस म्हणून
मी वाचत होतो बसून,
तेवढ्यात सोलण्यासाठी किचनमधून
आला अर्धा किलो लसूण,
जणू काही बसले होते
नशीब माझ्यावरती रुसून,
मित्र म्हणाले करता काय
पाने आमच्या तोंडाला पुसून,
उपयोग नसतो अशावेळी
तणाव चेहऱ्यावरती दिसून,
लागलो मग कामाला
मीही एकदम कसून,
ढिग बघता लसूण पाकळ्यांचा
शेवटी दाद मिळाली हसून...
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*दीपक महाले, शिरूर कासार*.
*बोला: 98 23 38 49 09*.

