shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बनकरवाडीचे वैभव बनकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती.

बनकरवाडीचे वैभव बनकर यांची  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)कार्यकर्ता संवाद मेळावाचे आयोजन  राष्ट्रीय कार्यअध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, माजी सभापती प्रवीण माने, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे,  यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला .यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले. 
यामध्ये विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी वरकुटे बुद्रुकचे संचालक व बनकरवाडी गावचे वैभव बनकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी पुणे जिल्हा ग्रामीण  पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अध्यक्ष स्वप्निल अरुणआबा गायकवाड  यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
नियुक्ती पत्रात नमूद केले आहे की,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  आ.  जयंत पाटील  व  महेबुब शेख प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने आपली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष या पदी नियुक्ती करत आहोत.

खासदार  शरदचंद्र पवार  यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँगेसच्या माध्यमातुन सर्वसामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल ही अपेक्षा !आपल्या निवडीबद्दल आपले अभिनंदन ! अशा आशयाचे नियुक्तीपत्र वैभव बनकर यांना 
देण्यात आले. यावेळी बंनकरवाडीतील युवक व पदाधिकारी मान्यवर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
close