shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयाला जनआधारचे प्रकाश पोटे यांनी ठोकले टाळे...!


'घोसपुरी जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या' निकृष्ट कामाची चाचणी करण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ

"आता फक्त टाळे ठोकलं यापुढं अधिकाऱ्याचे तोंड काळे करू" - प्रकाश पोटे


अहमदनगर:-
Anc - मागील ६ महिन्यांपूर्वी नगर तालुक्यातील घोसपुरी जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले असून या घोसपुरी योजने अंतर्गत १५ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेसाठी तब्बल ५० कोटी रुपये एवढा निधी मंजूर केला आहे. परंतु ठेकेदाराकडून निकृष्ट काम सुरू असल्याची पोलखोल जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. 

विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या सहीने, ठेकदारास जवळपास १० टक्के बिल अदा केलेले आहे. या बाबतची माहिती मागील पंधरा दिवसांपूर्वी संबंधीत संघटनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे अधीक्षक अभियंता श्री.एस.एम.मोरे यांना लेखी निवेदन देऊन सांगितले होते. आज या बाबतीत माहिती घेण्यासाठी जन आधार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालय येथ पदाधिकाऱ्यांसह गेले असता, त्या ठिकाणी अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता हे दोघेही मुख्य अधिकारी नसल्याने संघटनेच्या वतीने आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. 


यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत शेखर पंचमुख, योगेश भालेराव, भीमा कराळे, दीपक गुगळे, अमित गांधी, निलेश सातपुते आदी उपस्थित होते.
close