shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिवाळी निमित्त 'अशोक' चे सभासद व कामगारांना ३ कोटी ९० लाखाचे वाटपः व्हा.चेअरमन शिंदे..!


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्याची कामधेनू असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठेवींवरील व्याज रु.१ कोटी, सुधारीत जातींसाठीचे ऊस लागवड अनुदान रु.३५ लाख, कामगार बोनस रु.२ कोटी ५५ लाख, अशी एकुण रु.३ कोटी ९० लाखाची रक्कम अदा केली असल्याची माहिती व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी दिली.

            याबाबत सविस्तर माहिती देताना श्री.शिंदे यांनी सांगीतले की, दिवाळी सणानिमित्त सभासद, ऊस उत्पादक यांना विविध ठेवींवरील व्याजाची देय असणारी रक्कम रु.१ कोटी, सुधारित जातींसाठीचे ऊस लागवड अनुदानाची प्रतिटन रु.शंभर प्रमाणे देय असलेली रक्कम रु.३५ लाख संबंधित सभासद, ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात गुरुवार (दि.९) रोजी वर्ग करण्यात आली आहे. ठेवीवरील व्याजाची रु.शंभर पर्यन्तची रक्कम कारखान्यावर रोखीने अदा केली जाईल. तर रु.शंभरावरील रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

         दिवाळी सणानिमित्त कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय चेअरमन माजी आ.मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार होणारी रु.२ कोटी ५५ लाख रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आली आहे.

          अशा त-हेने दिवाळी सणानिमित्त सभासद, ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांना ३ कोटी ९० लाख रक्कम अदा केली जाणार आहे. यामुळे श्रीरामपूर शहराची बाजारपेठ फुलणार आहे. तसेच बेलापूर, टाकळीभान या ठिकाणच्या बाजारपेठेतही आर्थिक उलाढाल होणार असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगीतले.

*पत्रकार इम्रान एस.शेख- श्रीरामपूर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close