शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२३
सावित्रीबाई फुले विद्यालयाचा अनोखा उपक्रम : प्रदूषण मुक्त दिपावली साजरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार..!!
राहुरी : सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी येथे ज्या विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिपावली साजरी करून सुट्टीचा उपयोग पुस्तके वाचना करीता केला. अशा सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने, प्रशस्तीपत्र ,पुष्पगुच्छ व पेन देऊन गौरव करण्यात आला.
दीपावली सुट्टीला जाण्यापूर्वी शासन व विद्यालयाच्या वतीने दिपावली सणाच्या काळात विद्यार्थ्यांनी फटाके न फोडता पर्यावरणाचे रक्षण करावे व या रक्कमेचा उपयोग पुस्तके वाचन करण्याकरीता अथवा छंद जोपसण्याकरीता करावा असे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाला अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या चांगल्या गुणाबद्दल सुमारे ८० विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहीरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे ,पर्यवेक्षक मनोज बावा, यांच्या हस्ते करण्यात आला . या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. महानंद माने , खजिनदार महेश घाडगे यांनी कौतुक केले.
या प्रसंगी शिक्षक रविंद्र हिवाळे ,प्रकाश शिंदे, ज्ञानदेव देवकर , संतोष जाधव, बाबासाहेब शेलार ,घनश्याम सानप , सुरेखा आढाव , संगिता नलगे व इतर सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विदयार्थी उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

