लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयात संविधान दिन साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी ता. इंदापूर जिल्हा पुणे मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.ज्युनियर विभागाचे प्रा सदाशिव दगडे सर, विद्यालयाचे प्राचार्य भीमराव आवारे सर व सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सामुदायिक संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले.

