shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मख़दुम सोसायटी तर्फे स्वातंत्र सेनानी अशफाकुलाह खान जयंती निमित्त मोफत रक्तगट तपासणी व पुस्तके वाटप


नोकरीसाठी शिक्षण ही धारणा बदलण्याची आवश्यकता- ऍड. अमीन धाराणी

अहमदनगर प्रतिनिधी:
मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिक्षण देऊन चांगली नोकरी मिळावी हेच लक्ष ठेवून पालकवर्ग आज जीवाचे रान करत आहेत, नोकरीसाठी शिक्षण ही धारणा मोठ्या प्रमाणात समाजामध्ये घर करुन बसली आहे ती बदलण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संगीत प्रेमी ऍड.अमीन धाराणी यांनी केले.

मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्यावतीने स्वातंत्रता सेनानी शहीद अशफाकुलाह खान यांच्या जयंतीनिमित्त येथील अल-करम हाॅस्पिटलच्या सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळा फकीरवाडा येथे मुलांची मोफत रक्तगट तपासणी करून उर्दू बालसाहित्याची पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आली. यावेळी "गाता रहे मेरा दिल" ग्रुपचे ऍड.अमीन धाराणी, ऍड.गुलशन धाराणी, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबिद दूल्हेखान, मुख्याध्यापीका अंजुम शेख,हुजैफ शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना आबीद खान म्हणाले,विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करावे व यासाठी अभ्यास व्यतिरिक्त वेगवेगळ्या उपक्रमातही भाग घ्यावा, असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी दिलशाद शेख यांनी शाळे मार्फत राबविण्यात येणार्‍या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. आनंददायी वातावरणातील शिक्षणासाठी शिक्षकांकडून देण्यात येणार्‍या अध्यापनाची व मुलांना खेळण्यासाठी शाळेत असलेल्या सुविधांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमैया पठाण यांनी केले. शेवटी फरीदा सैय्यद यांनी सर्वांचे आभार मानले.


*सहयोगी:
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अहमदनगर - *9860477869
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close