shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पतसंस्था अनामत बुडतीच्या मार्गावर?

अनेक पतसंस्था बुडाल्या, तर
अनेक पतसंस्था पळून गेल्या !
ठेवीदारांचा काय कसुर,त्यांच्या
अनामती मिळेना काही केल्या !!

बीड सहकार क्षेत्रात मोठी खळबळ, साईराम
 मल्टिस्टेटच्या सर्वच शाखा एकाच वेळी बंद

बीड प्रतिनिधी:
बीड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात तब्बल २० शाखा असलेल्या साईराम अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखा अचानक बंद झाल्या आहेत. यामुळे या सोसायटीत ठेवी ठेवलेल्या ठेवीदारामध्ये खळबळ उडाली आहे. सदरची माहिती समजताच ठेवीदारांनी मोठ्या संख्येने बँकेच्या समोर गर्दी केली आहे. 

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जिजाऊ माँ साहेब मल्टिस्टेट परिवर्तन मल्टिस्टेट किंवा इतर काही पतसंस्था यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्यांमुळे पतसंस्था बंद झाल्या आहेत. यानंतर बीड शहरातील माळीवेस भागात मुख्य शाखा असलेल्या साईराम अर्बन या पतसंस्थेच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखांमध्ये हजारो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी आहेत. अशात सर्व शाखा बंद असल्याने ठेवीदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे ठेवीदारांनी मुख्य शाखेसमोर गर्दी केली आहे. 

*गर्दी झाल्याने रोकड देण्यास अडचण*

बँकेचे व्यवस्थापक साईनाथ परभणी यांनी ठेवीदारांनी विश्वास ठेवावा. एकही रुपया ठेवणार नाही. ठेवीदाराने एकाच वेळी गर्दी केल्याने रोकड देण्यात अडचण निर्माण होत असल्याने, थोडा वेळ देण्याचे आवाहन केले आहे. मात्र बँक बंद असल्याने ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कारण गेल्या काही दिवसात जिजाऊ माँ साहेब मल्टिस्टेट, परिवर्तन मल्टिस्टेट किंवा इतर काही पतसंस्था यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्यांमुळे पतसंस्था बंद झाल्या अथवा पळून गेल्या असल्याने ठेवीदारांच्या अनामती बुडल्या आहेत ?,ते आपल्या अनामती परत मिळविण्यासाठी रात्रंदिवस चिंताग्रस्त झालेले असल्याचे दिसून येत आहे.
close